जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार – माहिती !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या आर्थिक अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाचा ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने घेतला असल्याची माहिती गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका तथा मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

   महाराष्ट्रात यंदा मान्सूनमधील पावसाची प्रचंड तूट (सुमारे १८% ते १९%) आणि ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्य सरकारने राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ (ट्रिगर-1) जाहीर केला आहे.याचा अर्थ राज्याचा जवळपास ७४% ते ७५% भाग सध्या दुष्काळाच्या तीव्र छायेत आहे.
मराठवाडा (३८% पावसाची तूट) आणि विदर्भ (२७% पावसाची तूट) या भागांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.जून ते सप्टेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये २५ ते ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे करपली आहेत.कापूस,सोयाबीन,मका,तूर आणि बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यवतमाळ (१६ तालुके),जळगाव (१५ तालुके), तसेच अहिल्यानगर (अहमदनगर),नागपूर,अमरावती आणि नांदेड (प्रत्येकी १४ तालुके) या जिल्ह्यांमध्ये स्थिती सर्वाधिक गंभीर आहे.या जिल्ह्यात पाऊस नसल्याने धरणांमधील पाणीसाठा खालावला असून,ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हीट’ आणि पाण्याच्या टंचाईची मोठी चिंता निर्माण झाली आहे.पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे.त्यामुळे कृषिक्षेत्राचे पाणी कमी होणार आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर पुष्पलता काळे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close