सहकार
सोनेतारण कर्जामुळे…या संस्थेचा कारभार प्रगती पथावर-काळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज क्षेत्रात समताने उल्लेखनीय काम केले असून,ही बाब आमच्यासाठी देखील प्रेरणादायी आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोनेतारण कर्जामुळे समताचा कारभार प्रगती पथावर असून संस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सभासदांना त्वरित सेवा देण्यासाठी सातत्याने नवे उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी बँका व पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मिलिंद काळे यांनी नुकतेच केले आहे.

“समता पतसंस्था ही नवपर्वात प्रवेश करत आहे.चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून सुरू झालेली समता आज मोबाईल बँकिंग,पेपरलेस,व्हाउचरलेस आणि सेल्फ बँकिंगसारख्या अत्याधुनिक सुविधा सभासदांना देत उंच शिखरावर पोहोचली आहे.संचालक मंडळ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा व एकजूट हीच समतेची ताकद आहे.नव्या पर्वात या सोन्याला आणखी झळाळी देण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करूया”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव.
नाशिक येथील आरिया रिसॉर्ट अँड पार्क येथे समता पतसंस्थेची ‘नवपर्व’ वार्षिक आढावा बैठक (२०२५-२६) संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद काळे बोलत होते.
सदर प्रसंगी समता पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल,ज्येष्ठ संचालक जितेंद्र शहा,कचरू मोकळ,दीपक अग्रवाल,गिरीश सोनेकर,संचालिका अक्षरा पटेल,श्वेता अजमेरे,भरत अजमेरे,जनरल मॅनेजर सचिन भट्टड तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी,सर्व शाखांचे शाखाधिकारी,कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समता पतसंस्थेने ठेव वाढीत कोपरगाव,श्रीरामपूर,संगमनेर व शिर्डी शाखांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सोनेतारण कर्ज वितरणात येवला,पुणे,वैजापूर,श्रीरामपूर, जामखेड तसेच पंचवटी,पुंडलिकनगर,नेवासा,निफाड आणि नांदगाव शाखांचा गौरव करण्यात आला आहे.ठेव व कर्ज या दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट योगदानाबद्दल येवला,पुणे,शिर्डी व संगमनेर शाखांना सन्मानित करण्यात आले.कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे,कोल्हार शाखेचे शाखाधिकारी व्यंकटेश वैष्णव तसेच शिर्डी शाखेचे शशिकांत सोनवणे आणि पुणे शाखेचे निरंजन शिर्के यांनाही विशेष गौरविण्यात आले असल्याचे प्रतिपादन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक संदीप कोयटे यांनी केले आहे तर उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष अरविंद पटेल यांनी व्यक्त केले.तर संस्थेचा मागील वर्षाचा वार्षिक आढावा महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी सादर केला.यावेळी मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांचा प्रमुख पाहुणे मिलिंद काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.



