सहकार
दोन मंत्र्यांची कोपरगावात पायधूळ,जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी…या नेत्याची शक्यता !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या ‘सहकार विकास आघाडी’ने २१ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष बँकेच्या अध्यक्ष पदाकडे लागले असून,याचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याच्या बातम्या असून काल रात्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपली पायधूळ कोपरगाव येथील ईशान्यगडाच्या नेत्यांच्या दारात झडली असल्याचे वृत्त असून आज दुपारी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी त्याची पुनरावृत्ती केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे माजी खा.सुजय विखे यांची अध्यक्षपदाची शक्यता वाढली असल्याचे दिसत आहे.

माजी खा.सुजय विखे यांना अध्यक्षपदासाठी जिल्ह्यात सर्वाधिक आणि कट्टर विरोध हा केवळ कोपरगाव येथून कोल्हे यांच्याकडूनच होऊ शकतो याची जाणीव विखे कुटुंबास आहे.परिणामी यांनी मुंबईहून त्याचे सूत्र हलविण्यास सुरू केली असल्याचे मानले जात आहे.परिणामी आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आज दुपारी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात आपला वेळ खर्ची घालून इशान्यगडावर आपली हजेरी लावली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे माजी खा.सुजय विखे यांची शक्यता वाढली आहे.
अहिल्यांनगर जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून,१२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नूतन संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या ‘सहकार विकास आघाडी’ने २१ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष बँकेच्या अध्यक्ष (चेअरमन) पदाकडे लागले असून,याचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.सहकार विकास पॅनलमध्ये भाजपचे ८ संचालक असल्याने अध्यक्षपदावर भाजपचा प्रबळ दावा मानला जात आहे.यामध्ये माजी खासदार डॉ.सुजय विखे,आमदार मोनिका राजळे आणि बिपीन कोल्हे यांची नावे आघाडीवर आहेत.जिल्हा बँकेच्या ६८ वर्षांच्या इतिहासात अद्याप एकाही महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही.यंदा संचालक मंडळात ६ महिला निवडून आल्याने आमदार मोनिका राजळे किंवा इतर महिला संचालकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ती शक्यता दुरवरची वाटत आहे.

महायुतीचे समीकरण पाहता अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे आणि शिवसेनाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचीही नावे चर्चेत आहेत.पॅनलमध्ये सर्वाधिक आमदार व संचालक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे (१२ ते १३ संचालक) असले,तरी माजी खा.सुजय विखे यांनी अध्यक्षपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला आहे.फडणवीस ज्या नावावर शिक्कामोर्तब करतील,तोच उमेदवार अध्यक्ष होईल असे विखे यांनी स्पष्ट केले आहे.त्याला रात्री पासून दुजोरा मिळत असून त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रात्रीच्या सुमारास आपली पायधूळ ईशान्य गडाचे नेते बिपीन कोल्हे यांच्या घरी येसगाव येथे वस्तीवर धाडली आहे.विखे यांना जिल्ह्यात सर्वाधिक आणि कट्टर विरोध हा केवळ कोपरगाव येथूनच होऊ शकतो याची जाणीव विखे कुटुंबास आहे.परिणामी यांनी मुंबईहून त्याचे सूत्र हलविण्यास सुरू केली असल्याचे मानले जात आहे.परिणामी आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आज दुपारी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात आपला वेळ खर्ची घालून इशान्यगडावर आपली हजेरी लावली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे माजी खा.सुजय विखेयांची शक्यता वाढली आहे.



