जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कारखान्याच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांना वाटा -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   “आपल्या कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याने आजवर जी प्रगती केली,जे यश मिळवले,जे पुरस्कार मिळवले,त्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या कष्टांचा,निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा मोठा वाटा आहे असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील कर्मचा-यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, समवेत उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक मंडळ व पदाधिकारी.

“कर्मचाऱ्याची सेवानिवृत्ती ही नोकरीची असते;नात्याची कधीच नसते.तुम्ही या कारखान्याचे आणि काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता,आहात आणि कायम राहाल.या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले राहतील.सेवा संपली असली तरी आपले नाते कायम राहील” – आ.आशुतोष काळे,अध्यक्ष कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना ली.गौतमनगर.

   कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील 41 कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहे.त्यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह सत्कार सोहळा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे,संचालक सुधाकर रोहोम,दिलीप बोरनारे,सूर्यभान कोळपे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,शंकरराव चव्हाण,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले,राहुल रोहमारे,अनिल कदम,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,वसंत आभाळे,सुरेश जाधव,विष्णु शिंदे,दिनार कुदळे,प्रशांत घुले,गंगाधर औताडे,श्रावण आसने यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबासाहेब सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ,लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,” कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहात कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे नाते केवळ कामापुरते मर्यादित नाही.काळे परिवाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्य मानले आहे.सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा आपण जपली आहे. हीच आपल्या संस्थेची खरी ताकद आणि खरी ओळख आहे.सेवानिवृत्ती ही नोकरीची आहे नात्याची नाही.तुमचे प्रेम,विश्वास आणि आशीर्वाद नेहमीच या उद्योग समूहाच्या आणि काळे परिवाराच्या पाठीशी राहिले आहेत.आपणापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी सेवेबरोबरच स्व.माजी खा.शंकरराव काळे,माजी आ.अशोक काळे व मला देखील सामाजिक,राजकीय वाटचालीत मोलाची साथ दिली त्यामुळे मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.सेवानिवृत्ती ही नोकरीची असते;नात्याची कधीच नसते.तुम्ही या कारखान्याचे आणि काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता,आहात आणि कायम राहाल.या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले राहतील.सेवा संपली असली तरी आपले नाते कायम राहील.यापुढील आयुष्यात आवडी-निवडी जपा,कुटुंबाला वेळ द्या,नातवंडांसोबत खेळत आयुष्याचा आंनंद घ्या असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.           

    सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिव बाबासाहेब सय्यद यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव संदीप शिरसाठ यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close