विशेष दिन
…या पंचायत समितीत होणार महाराष्ट्र दिन साजरा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीत शुक्रवार दि.०१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम दहीगाव बोलका येथील कै.सुनिल रावसाहेब वलटे,शहिद जवान नायब सुबेदार यांची वीर पत्नी श्रीमती मंगलताई सुनील वलटे यांच्या हस्ते सकाळी ठिक ७.३० वा आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले आहे.

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.या दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते आणि राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.

१ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाले,याच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.या दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते आणि राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.मुंबईसह महाराष्ट्र राज्यासाठी ज्या १०६ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यांना या दिवशी विशेष अभिवादन केले जाते.कोपरगाव पंचायत समितीत हा महाराष्ट्र दिन दिनाक 01 मे सोजी सकाळी 7.30 वाजता संपन्न होत आहे.त्यासाठी तरी सर्वानी सदर कार्यक्रमास सकाळी ७.१५ वाजता उपस्थित रहावे.असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी शेवटी केले आहे.



