शैक्षणिक
…या संशोधकास पी.एच.डी.पदवी प्रदान!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील स्ट्रक्चरल् इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या संशोधन केंद्रातील संशोधक सुमित साईदास कोळपकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अभियांत्रिकी विषयातील विद्या वाचस्पती (पी.एच.डी.) पदवी नुकतीच संपादन केली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव,सहजानंदनगर येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील स्ट्रक्चरल् इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या संशोधन केंद्रातील संशोधक सुमित साईदास कोळपकर यांनी “स्ट्रेस ॲनालिसिस ऑफ फंक्शनली ग्रेडेड शेल्स अंडर हैग्रो-थर्मो-मेकॅनिकल लोडिंग्स” या विषयावर त्यांनी संशोधनकार्य पूर्ण केले होते.त्यांना स्ट्रक्चरल् इंजिनिअरिंग तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ.ए.एस.सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले होते.त्यांचे संशोधन स्ट्रक्चरल् इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या संशोधनकार्याशी संबंधित सात संशोधन लेख (रिसर्च आर्टिकल) नामांकित आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये (रिसर्च जर्नल) प्रकाशित झाले आहेत.दरम्यान त्यांच्या या यशाचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे,विश्वस्त अमित कोल्हे,आ.विवेक कोल्हे,व्यवस्थापन,संचालक,विभाग प्रमुख आदींनी अभिनंदन केले आहे.



