क्रीडा विभाग
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी…या विद्यार्थिनीची निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वर्धा विजय पवार हिने पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पार पडलेल्या शालेय शासकीय विभागीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत २२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान तिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कराटेसारख्या मार्शल आर्ट प्रकारात यश मिळविण्यासाठी नियमित सराव,शारीरिक क्षमता,एकाग्रता,शिस्त,आत्मविश्वास आणि जिद्द यांची आवश्यकता असते.या सर्व गुणांच्या जोरावर कु.वर्धाने पवार हिने मिळविलेले यश लक्षणीय मानले जात आहे.
बारामती येथे आयोजित शालेय शासकीय विभागीय कराटे स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वर्धा पवार हिने लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि २२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे.तिच्या या यशामुळे आता तिला राज्यस्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे क्रीडा शिक्षक निलेश बडजाते यांनी तिला मार्गदर्शन केले होते.
कराटेसारख्या मार्शल आर्ट प्रकारात यश मिळविण्यासाठी नियमित सराव,शारीरिक क्षमता,एकाग्रता,शिस्त,आत्मविश्वास आणि जिद्द यांची आवश्यकता असते.या सर्व गुणांच्या जोरावर वर्धाने मिळविलेले यश लक्षणीय मानले जात आहे.तिच्या या यशाबद्दल कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,खजिनदार आनंद ठोळे,सदस्य डॉ.अमोल अजमेरे,संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सुरेंद्र शिरसाळे,उपमुख्याध्यापिका सुजाता अजमेरे,पर्यवेक्षक बलभिम उल्हारे आदींनी अभिनंदन केले आहे.



