पशुसंवर्धन विकास
…या ठिकाणी सुरू होणार पशुधनाची आनुवंशिक तपासणी प्रयोगशाळा -माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाचे कार्यस्थळी सहजनंदनगर या ठिकाणी संघाच्या गोदावरी-बायफ पशुरोग निदान प्रयागशाळेत नव्याने सुरू होत असलेल्या अनुवंशीक गुणवत्ता तपासणी व संकरीत गाईंमधील देशी व विदेशी रक्तांचे अचूक प्रमाण शोधणे या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा रविवार दि.२१ जून रोजी सकाळी ०९ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

“पशुधनाची आनुवंशिक गुणवत्ता तपासणी (जेनेटिक टेस्टिंग) म्हणजे आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे जनावरांची दूध किंवा मांस उत्पादन क्षमता,रोगप्रतिकारशक्ती आणि पैदाशीचे गुणधर्म तपासणे होय.ही तपासणी डीएनए चाचणीच्या माध्यमातून केली जाते.आनुवंशिक गुणवत्ता तपासणीचे महत्त्व म्हणजे गाय किंवा म्हैस जन्माला आल्यापासून किंवा लहान वयातच तिची दूध देण्याची क्षमता आणि फॅटची टक्केवारी जनुकीय चाचणीद्वारे ओळखता येते.त्याचा फायदा दूध उत्पादकांना आगामी काळात मिळणार आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघ.
गोदावरी दूध संघ कोपरगावने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी आणि पर्यावरणपूरक नवीन उपक्रमांचा शुभारंभ केला आहे.यासोबतच, दुग्धोत्पादनात ‘हरीत धारा’ हा मिथेन उत्सर्जन कमी करणारा पशुआहार आणि ‘साईप्रसाद पेढा’ यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय विस्तार केला असताना आता संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाचे कार्यस्थळी सहजनंदनगर या ठिकाणी संघाच्या गोदावरी-बायफ पशुरोग निदान प्रयागशाळेत नव्याने सुरू होत असलेल्या अनुवंशीक गुणवत्ता तपासणी व संकरीत गाईंमधील देशी व विदेशी रक्तांचे अचूक प्रमाण शोधणेचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी राज्याच्या जलसंपदाचे प्रधान सचिव एकनाथ डवले हे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते हा उपक्रम सुरू होणार आहे.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी खा.व पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे हे राहणार आहे.तर त्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.शीतलप्रमुख मुकणे,माजी उपाध्यक्ष डॉ.सुनील तुम्बारे,नाशिक बायफचे प्रादेशिक संचालक डॉ.रविराज जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती दूध संघावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
पशुधनाची आनुवंशिक गुणवत्ता तपासणी (जेनेटिक टेस्टिंग) म्हणजे आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे जनावरांची दूध किंवा मांस उत्पादन क्षमता,रोगप्रतिकारशक्ती आणि पैदाशीचे गुणधर्म तपासणे होय.ही तपासणी डीएनए चाचणीच्या माध्यमातून केली जाते.आनुवंशिक गुणवत्ता तपासणीचे महत्त्व म्हणजे गाय किंवा म्हैस जन्माला आल्यापासून किंवा लहान वयातच तिची दूध देण्याची क्षमता आणि फॅटची टक्केवारी जनुकीय चाचणीद्वारे ओळखता येते. ए-१ आणि ए-२ दुधाचा प्रकार तसेच केप्पा-केसीन व बीटा-केसीन यांसारख्या प्रथिनांचे प्रमाण तपासले जाते.जातिवंत पैदास करण्यासाठी उत्कृष्ट वंशावळीचे व आनुवंशिक दोष नसलेले नर (रेडे/बैल) निवडणे सोपे जाते.त्यामुळे या प्रयोगशाळेला महत्व आले आहे.त्याचा पशुपालक जास्त फायदा घेण्याची शक्यता आहे.या प्रस्तावित उपक्रमाबद्दल कोपरगाव,राहाता तालुक्यातील पशुपालकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.



