न्यायिक वृत्त
अॅट्रॉसिटी गुन्हा,दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर तर तिसरा फेटाळला!

न्यूजसेवा
कोपरगांव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील नुकत्याच झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तीन आरोपी विरुद्ध गुन्ह्यात यातील तीन आरोपींनी कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दखल करण्यात आला होता.त्यातील आरोपी विलास शिवाजी खालकर,दिलीप नवनाथ खालकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला केला आहे तर तिसरा व प्रमुख आरोपी प्रसाद भास्कर खालकर याचा अर्ज मात्र फेटाळण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान यातील दोन्ही आदेशांत जामीन मंजूर झालेल्या आरोपींना अटक झाल्यास प्रत्येकी ५० हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेच्या जामीनदारावर सोडण्याचे आदेश देताना न्यायालयाने कायमस्वरूपी रहिवासाचा पुरावा व छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करणे,तपासकामात कोणताही अडथळा न आणणे,तपास अधिकाऱ्यास सहकार्य करणे आणि अंतिम अहवाल दाखल होईपर्यंत प्रत्येक एक आड एक मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहणे.आदेशाची प्रत संबंधित पोलीस ठाण्यास कळविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नोंद होणारे गुन्हे आणि सामाजिक तणाव ही एक गंभीर व चिंतेची बाब बनली आहे.या वाढत्या घटनांमागे सामाजिक असुरक्षितता,कायद्याचा गैरवापर आणि जातीय व सामाजिक तेढ ही मुख्य कारणे मानली जात आहेत.ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही तळागाळातील लोकांवर होणारा अन्याय पूर्णपणे थांबलेला नाही,ज्यामुळे सुरक्षेसाठी कायद्याची गरज भासते.वैयक्तिक राग,मालमत्तेचे वाद किंवा पूर्वग्रहातून ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याने समाजात अस्वस्थता निर्माण होत आहे.पोलिसांकडून वेळेवर आणि योग्य निष्पक्ष तपास न झाल्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही किंवा निष्पाप व्यक्ती अडकतात.कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे दि.09 जुलै 2023 रोजी रात्री अशीच एक घटना उघडकीस आली आहे.”शिर्डी पोलिस ठाण्याचे हद्दीत कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील आरोपींनी त्याच गावातील 23 वर्षीय फिर्यादी इसम हा दिनांक 09 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता त्याचे वस्तीवर वीज नसल्याने आपला भ्रमणध्वनी चार्जिंग करण्यासाठी गावात आला होता.त्याने आपला भ्रमणध्वनी चार्ज करून तो आपल्या दुचाकीवरून आपल्या घरी जात होता.तो त्याच गावाचे स्मशानभूमी जवळ आला असता त्याचे वस्तीकडून विरुद्ध बाजूने तीन आरोपी हे त्यांच्या दुचाकीच्या सहाय्याने आले होते.त्यांनी त्यांचे सीटवर लोखंडी पाईपने मारले होते.त्यामुळे फिर्यादी हा आपली दुचाकी फिरवून आला व त्यांना त्याचा जाब विचारला होता.त्यातील प्रसाद खालकर याने फिर्यादीच्या शर्ट ची कॉलर पकडून शिवीगाळ करू लागला होता.”तुला गावात राहायचे आहे का ? तुझं गावात एकच घर आहे.निम्म्या रात्री मळ्यात तुला मारून टाकू,तुझे भाऊबंद व तुझे जातीचे लोक काहीही करणार नाही” अशी अद्वातद्वा बडबड करून आपल्याला हाताचे चापटीने मारहाण केली होती.आरोपीचा दुसरा सहकारी विलास खालकर याने गाडीचे खाली उतरून लोखंडी पाईपने मानेवर मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यानंतर फिर्यादीने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला असता त्याची गाडी अडवून फिर्यादीसह खाली पाडले.विलास खालकर याने हातातील पाईपने पायावर,पाठीवर मारले प्रसाद खालकर याने हात धरले व आक्षेपार्ह कृती करून बेल्टने मारहाण केली असल्याचा आरोप आहे.दिलीप खालकर याने फिर्यादी इसमास बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप आहे.त्यानंतर फिर्यादीने आरडाओरडा केल्याने त्या ठिकाणी निलेश खालकर आला त्याने हे भांडण सोडविल्यानंतर फिर्यादी त्यानंतर आपल्या घरी निघून गेला होता.

दरम्यान फिर्यादीने शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्र.आय-६१९/२०२६ अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 1989 प्रमाणे भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२),११८(१),३(५),३५१(२) व ३५२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम ३(१)(इ),३(१)(आर),३(१)(एस) व ३(२)(व्हीए) अन्वये दाखल केला होता.
दरम्यान या गुन्ह्यातील तीन आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी कोपरगाव येथील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याखालील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिपक आलमले यांचेकडे अर्ज केला होता.त्याची सुनावणी होऊन त्यातील आरोपी विलास शिवाजी खालकर,दिलीप नवनाथ खालकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला केला आहे तर तिसरा आरोपी प्रसाद भास्कर खालकर याचा अर्ज मात्र फेटाळण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड.जयंत जोशी यांनी,”फिर्यादीच्या जातीवरून अपमान केल्याचा तसेच तो सार्वजनिक नजरेसमोर झाल्याचा कोणताही स्पष्ट आरोप प्रथम खबरी अहवालात नसल्याने अॅट्रॉसिटी कायद्याखाली प्रथमदर्शनी गुन्हा तयार होत नाही.त्यामुळे कलम १८ व १८-अ चा प्रतिबंध लागू होत नाही,असे म्हणणे मांडून उच्च न्यायालयाचे सात न्यायनिर्णय दाखल करण्यात आले होते.याउलट सरकारी अभियोक्ता व फिर्यादीच्या वकिलांनी घटना सार्वजनिक रस्त्यावर व लोकांच्या नजरेसमोर घडल्याचे नमूद करून अर्ज फेटाळण्याची विनंती केली होती.तर फौजदारी जामीन अर्ज क्र.१६४/२०२६ मध्ये न्यायालयाने नमूद केले की,”प्रथम खबरी अहवालाच्या वाचनावरून आरोपी प्रसाद भास्कर खालकर याने फिर्यादीचा जातीवाचक अपमान सार्वजनिक ठिकाणी व लोकांसमक्ष केल्याचा आरोप असून घटनेस साक्षीदारही आहे.त्यामुळे त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी अॅट्रॉसिटी कायद्याखालील गुन्हा दिसून येतो व दाखल न्यायनिर्णय त्याच्या प्रकरणास लागू होत नाहीत.त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळून आरोपी दिलीप नवनाथ खालकर यास मात्र दिलासा देण्यात आला आहे.
दरम्यान यातील दोन्ही आदेशांत जामीन मंजूर झालेल्या आरोपींना अटक झाल्यास प्रत्येकी ५० हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेच्या जामीनदारावर सोडण्याचे आदेश देताना न्यायालयाने कायमस्वरूपी रहिवासाचा पुरावा व छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करणे,तपासकामात कोणताही अडथळा न आणणे,तपास अधिकाऱ्यास सहकार्य करणे आणि अंतिम अहवाल दाखल होईपर्यंत प्रत्येक एक आड एक मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहणे.आदेशाची प्रत संबंधित पोलीस ठाण्यास कळविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.या प्रकरणी आरोपींच्या वतीने ॲड.जयंत जोशी यानी कामकाज पाहीले तर त्यांना ॲड.संकेत जानी,ॲड.सुरेंद्र जाधव,ॲड.शिवम मोरे,ॲड.तन्मय घोडके यांनी सहकार्य केले आहे.



