जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात रविवार दिनाक 07 जूनच्या रात्री एका टोळक्याने केवळ उधारीवर पान दिले नाही म्हणून हातात तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन धारणगाव रोड परिसरात या तरुणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला चढवला याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी स्वराज सोळसेसह अन्य आरोपींनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळा असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोपी आरोपी स्वराज कृष्णा सोळसे,रितेश भाऊसाहेब सोनवणे,सनी उर्फ चेतन बबन जाधव व अरबाज उर्फ आसिफ कालीन शेख आदींनी कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीनासाठी आपल्या वकिलामार्फत अर्ज दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यातील आरोपींचा अर्ज न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून फेटाळला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.व सत्र न्यायालयांचे आणि पोलिसांचे मानले आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषद हद्दीत उनाड टोळक्याना धाक असल्याचे दिसून येत नाही.परिणामी वाळूचोर,गावठी कट्टे,गुटखा,मटका,आदी अवैध व्यवसाय आदींना मोठी बरकत आली असल्याचे मानले जात आहे.त्यांना चाप लावणे गरजेचे बनले आहे.रेशन घोटाळा,अवैध गोवंश हत्या आदींची त्यात भर पडत आहे.वारंवार तेच ते गुन्हेगार यात आढळून येत आहे.त्यामुळे शहर पोलिसांना या विरोधात मोठी आणि कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे.दि.07 जूनच्या रात्रीच एक आणखी एक घटना उघड झाली होती.यात फिर्यादी कुरेशी याने आपल्या पान टपरीवर पूर्वीची उधारी असल्याने आरोपीस पान न दिल्याने त्याचा राग येऊन आरोपी स्वराज कृष्णा सोळसे,रितेश भाऊसाहेब सोनवणे,सनी उर्फ चेतन बबन जाधव व अरबाज उर्फ आसिफ कालीन शेख यांच्या टोळक्याने तलवार,चाकू आदी हत्यारांनी उघड दहशत माजवली होती.त्यात फिर्यादीवर चाकू हल्ला करून त्यास जखमी केले होते.दरम्यान यात पोलिसांना याबाबतची खबर मिळाली असता त्यांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांवर हल्ला चढवला होता अशी चर्चा होती.शिवाय पोस्ट कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांची मोठी तोडफोड केली होती.दरम्यान पोलिसांनी या आरोपींना चांगलाच पाहुणचार करून त्यांची कोपरगाव शहरात मोठी आणि जंगी वरात काढली होती.परिणामी त्यांच्यात पोलिस वर्दीचा मोठा धाक तयार झाला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे,” पोलिस अधिकारी देर आये,दुरुस्त आये…’ असे म्हटले जात आहे.

   दरम्यान या प्रकरणी कुरेशी याने कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा क्रमांक 306/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 111(2),(बी) (3)(4),119(1),118(1),189(2),191(2)191(3),190,324(5) फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम 1932 चे कलम 07आणि शस्त्र अधिनियम कलम 4(254)अन्वये गुन्हा दाखल केला होता.दरम्यान यामुळे कोपरगाव शहरातील धारणगाव परिसर आणि सुभाषनगर आदी परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

   दरम्यान याप्रकरणी आरोपींनी कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीनासाठी आपल्या वकिलामार्फत अर्ज दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यातील आरोपींचा अर्ज न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून फेटाळला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे आरोपींना आता कायद्याचा धाक वाटेल असे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close