जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

अग्रवाल समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी…यांची निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  

   कोपरगाव येथील अग्रवाल चहा या ट्रेडिंगचे संचालक नारायण अग्रवाल यांची अहिल्यानगर अग्रवाल समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याची माहिती महाराष्ट्र अग्रवाल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र अग्रवाल यांनी दिली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नारायणशेठ अग्रवाल.

नारायणशेठ अग्रवाल यांनी याआधी साई संजीवनी सहकारी बँकेचे संचालक,महेश्वरी समाजाचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.इंदिरा शॉपिंग सेंटर व्यापारी संघाचे अध्यक्ष व कोपरगाव व्यापारी संघाचे उपाध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत.त्यांचे कोपरगाव शहरात सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहिले असून पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंड्याच्या सेवेत कायम अग्रेसर राहिले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    अखिल भारतीय अग्रवाल संमेलन (किंवा अखिल भारतीय अग्रवाल समाज संघटना) ही भारतातील अग्रवाल आणि वैश्य समाजाला संघटित करणारी आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारी एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.या संघटनेची अधिकृत स्थापना १९७५ मध्ये झाली.या संघटनेची स्थापना करण्यात किशनजी मोदी (संस्थापक अध्यक्ष) आणि लाला रामेश्वर दास (संस्थापक सरचिटणीस) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.याचे मुख्य कार्यालय करोल बाग,नवी दिल्ली येथे आहे.हा समाज महाराज अग्रसेन जी यांना आपले आराध्य दैवत आणि प्रवर्तक मानतो.त्यांच्याच तत्त्वांवर आणि आदर्शांवर चालून समाजसेवा करणे हे या संघटनेचे मुख्य ध्येय आहे.देशभरातील व जगभरातील अग्रवाल समाजाला एका छताखाली आणणे आणि विखुरलेल्या स्थानिक संस्थांना राष्ट्रीय पातळीवर जोडणे.गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक,वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत पुरवण्याचे काम करत आला आहे.यात कोपरगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणशेठ अग्रवाल यांची निवड होणे ही बाब गौरवाची मानली जात आहे.त्याबाबतचे पत्र नुकतेच प्रांतीय अध्यक्ष जितेंद्र अग्रवाल यांनी दिले आहे.

   नारायणशेठ अग्रवाल यांनी याआधी साई संजीवनी सहकारी बँकेचे संचालक,महेश्वरी समाजाचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.इंदिरा शॉपिंग सेंटर व्यापारी संघाचे अध्यक्ष व कोपरगाव व्यापारी संघाचे उपाध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत.त्यांचे कोपरगाव शहरात सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहिले असून पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंड्याच्या सेवेत कायम अग्रेसर राहिले आहे.त्यांच्या निवडीचे कोपरगावचे आ.आशुतोष काळे,आ.विवेक कोल्हे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,गोदावरी-परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगराध्यक्ष पराग संधान,व्यापारी रिटेलचे राज्याध्यक्ष सुधीर डागा आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close