निवड
…या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड जाहीर!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निशा खंडीझोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाच्या कविता अंकुश घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शहापूर ग्रामपंचायतीची निवडणूक सन -2021 साली झाली होती.त्यात आ.काळे गटाला व आ.कोल्हे गटाला प्रत्येकी चार जागा मिळाल्या होत्या.तर सरपंच पदी योगिता रमेश डांगे यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली होती.त्यात उपसरपंच पदाचे आवर्तन ठरविण्यात आले होते.
शहापूर ग्रामपंचायतीची निवडणूक सन -2021 साली झाली होती.त्यात आ.काळे गटाला व आ.कोल्हे गटाला प्रत्येकी चार जागा मिळाल्या होत्या.तर सरपंच पदी योगिता रमेश डांगे यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली होती.त्यात उपसरपंच पदाचे आवर्तन ठरविण्यात आले होते.त्या प्रमाणे रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच योगिता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत कविता घारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक शिवाजी सोमवंशी यांनी कविता घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
याप्रसंगी सरपंच योगिता डांगे,मावळत्या उपसरपंच निशा खंडीझोड,सर्व ग्रा.प.सदस्य सागर घारे,रामनाथ घारे,राजेंद्र पाचोरे,रमेश डांगे,वसंत पाचोरे,जनार्दन पाचोरे,अशोक डांगे,गणेश घारे, पोपट घारे,वाल्मिक घारे,गोविंद पाचोरे,अंकुश घारे,नवनाथ डांगे,सुनीता डांगे आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व शहापूर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच,सर्व सदस्य,काळे गटाचे कार्यकर्ते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच कविता घारे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



