जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात रणशिंग फुंकले,माघार संपन्न,अंतिम तयारी सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा राजकीय शिमगा सुरु झाला असून आता आपले नामनिर्देशन पात्र मागे घेण्याचा कालावधी संपली असून आता वेस-सॊयगाव,करंजी,डाऊच खु.आदी ठिकाणी तिरंगी लढती होत असून अन्य ठिकाणी काळे-कोल्हे या पारंपरिक विरोधकांच्या दुरंगी लढती रंगणार असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे सर्व ठिकाणी आपल्या सरदार आणि दरकदार आदींनी आपली घोडे,खोगीर बाहेर काढले असून तंगतोबारा सिद्ध केला आहे. व लढाईस जुंपून घेतले असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान दुष्काळी भागात राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या गेलेल्या वेस-सोयगाव येथे स्थानिक माजी सरपंच माणिक दिघे व निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते आप्पासाहेब कोल्हे गट तिसरी शक्ती म्हणून दुसऱ्यांदा लढत असून मागील वेळेस या गटाने काळे-कोल्हे या पारंपरिक दोन्ही गटांना दाती तृण घराण्याला भाग पाडले होते.यावेळेस काळे गटाची स्थिती नाजूक असून कोल्हे गट तुल्यबळ दिसत नाही.त्यामुळे तिसऱ्या गटाच्या विजयाची मतदारांत जास्त चर्चा सुरु आहे.

राज्यातील “ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जाहीर झाल्या असून कोपरगावात २६ ग्रामपंचायतींची नामनिर्देशन भरण्याची वेळ संपून छाननी व त्या पाठोपाठ काल माघार नुकतीच संपन्न झाली आहे.त्यात बऱ्याच ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत.तर वेस-सोयगाव,करंजी,खिर्डी गणेश आदी ठिकाणी मात्र तिरंगी लढती होत असल्याचे दिसून आले आहे. पुढे गावाचे नाव-प्रारंभी नामनिर्देशन पत्रांची सदस्य व सरपंच अर्ज संख्या-माघार घेतलेल्या उमेदवारांची सदस्य व सरपंच अर्ज संख्या-बिनविरोध निवडून आलेल्या सदस्य व सरपंच संख्या-अखेर निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांची व सरपंच पदासाठी शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या दर्शवली आहे.भोजडे-२२-१०,४-५,०-०,१८-५,सडे-१८-३,४-१,०-०,१४-२,शिंगणापूर-४१-३,६-१,०-०,३५-२,वेस-सोयगाव-४८-४,२३-१,०-०,२५-३,कोळपेवाडी-५७-५,२८-२,०-०,२९-३,वडगाव-२२-६,१-३,०-०,२१-३,मोर्विस-१६-३,३-०,१-०,१२-३,खिर्डी-गणेश-३४-९,७-३,०-०,२७-६,पढेगाव-४२-११,१२-६,०-०,२८-५,चासनळी-४३-१०,१०-४,०-०,३३-६,माहेगाव-देशमुख-४४-१०,१७-७,०-०,२७-३,रांजणगाव-देशमुख-२९-४,७-२,०-०,२२-२,शहापूर-२३-६,९-३,०-०,१४-३,बहादराबाद-२९-४,१४-२,०-०,१५-२,डाऊच-बु.-२२-४,८-१,०-०,१४-३,डाऊच-खु.-४६-६,१०-२,०-०,३६-४,देर्डे-कोऱ्हाळे-४६-५,२७-३,०-०,३६-४,तळेगाव-मळे-२१-५,३-२,०-०,१८-३,चांदेकसारे-३६-५,९-१,०-०,२७-४,धारणगाव-३५-६,१३-२,०-०,२२-४,हंडेवाडी-१६-७,३-४,१-०,१२-३,बक्तरपूर-१४-२,०-०,०-०,१४-२,सोनेवाडी-७३-१२,४६-९,०-०,२७-३,खोपडी-२५-१०,१२-६,२-०,११-४,करंजी-बु.-४३-५,१०-२,१-०,३२-३,बहादरपूर-२५-४,५-२,१-०,१९-२ आदींचा समावेश असून आलेल्या एकूण ८७० सदस्य आणि १५९ सरपंच पदांसाठी आलेल्या नामनिर्देशन पत्रापैकी २९१ जणांनी तर सरपंचाची आलेल्या अर्जापैकी ७४ जणांनी माघार घेतली आहे.तर २६ ग्रामपंचायतींपैकी ८ जण बिनविरोध निवडून आले आहे.तर आता रिंगणात सदस्य पदासाठी ५७१ तर सरपंच पदासाठी ८५ जण रिंगणात उरले आहे.दरम्यान वेस-सोयगाव शिवाय खिर्डी गणेश,(काळे,कोल्हे स्वतंत्र तर परजणे गट स्वतंत्र) वडगाव,(काळे गटाचे दोन गट त्यातील एकास परजणे गटाची साथ तर कोल्हे गट स्वतंत्र) माहेगाव देशमुख,(काळे,कोल्हे,प्रहार संघटना) करंजी (काळे,कोल्हे स्वतंत्र आणि उद्धव सेना गट)आदी ठीकाणी तिरंगी लढत होत असून त्यासाठी तिन्ही गट अंतिम तयारीसाठी लागले आहे. याशिवाय मोठ्या असलेल्या शिंगणापूर,कोळपेवाडी,रांजणगाव देशमुख,सोनेवाडी या राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या गेलेल्या ग्रामपंचायतीत पारंपरिक काळे-कोल्हे यांच्यात लढत रंगणार आहे.आगामी काळात मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.त्यामुळे आता कोपरगाव तालुक्यातील राजकीय पक्षांनी आपले घोडे त्यांचे खोगीर बाहेर काढले असून नाल,मेख,तंग तोबरा,बारुद तयारी सुरु केली असून आपल्या सरदार,दरकदार,बारगिरांना ताकीद फर्मावली आहे.त्यामुळे आता ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close