जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

रक्तदान हे अपघात आणि आपत्कालीन स्थितीत जीवदान-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

रक्तदान हे आधुनिक काळात अपघात आणि आपत्कालीन स्थितीत जीवदान ठरत असून या बाबत आयोजित केलेले उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते.तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील डॉ.आंबेडकर उद्यान येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उद्यान उत्सव समिती व कोपरगाव येथील संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,श्रीराम राजेभोसले,माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब,माजी उपसभापती वाल्मिक कोळपे, माजी पोलीस अधीक्षक के.पी.रोकडे,संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ.निता पाटील,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर,सदस्य डॉ.आय.के. सय्यद,सविता लोंढे,बन्सी निकम,सुनील कोळपे,गणेश सुपनर,भरत मेहेरखांब,कोळगाव थडीच्या सरपंच मिनल गवळी,मोहन गायकवाड,दादासाहेब जगताप,अंबादास मेहेरखांब,सुंदर कोळपे,अरुण लोंढे व जयंती उत्सव समिती सदस्य,उपासक,उपासिका,रक्तदाते व संजीवनी ब्लड बॅंकेचे सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.समाजातील अनेक व्यक्तींना हवे असलेल्या रक्तगटाचे रक्त वेळेवर मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतात.त्यामुळे राबविण्यात आलेला रक्तदान उपक्रम कौतुकास्पद असून त्यामुळे कित्येक लोकांचे जीव वाचविण्यात मदत होणार आहे.यापुढील काळात देखील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close