जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगांवातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी राजकीय शिमगा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विविध सदस्यांचे निधन,राजीनामा,अनर्हता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्हयातील पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.आगामी २१ डिसेंबर रोजी मतदार घेण्यात येणार आहे.राहाता तालुक्यातील ८ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार कोपरगांव तालुक्यातील वारी – २,खिर्डी गणेश-१,दहिगांव बोलका-१,कोळपेवाडी-१,घारी-१, मोर्वीस-१,गोधेगांव-१,शहापूर-१ अशा एकूण ९ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात या गावात अवकाळी राजकीय शिमगा पाहायला मिळणार आहे.

नामनिर्देशनपत्राचा नमुना https://panchayatelection.maharastra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.उमेदवारांनी नामनिर्देशन पत्राचा नमुना ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट आऊट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी केवळ असे स्वाक्षरी करुन सादर केलेले नामनिर्देशन पत्र ऑफलाईन स्वरुपात स्विकारण्यात येईल. या निवडणूकांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वेळेत कोपरगांव तहसील येथे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ७ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

दि.९ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वितरण करण्यात येणार आहे. २१ डिसेंबर, मंगळवार रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने (OFF LINE) राबविण्यात येणार आहे. अशी माहिती ही बोरूडे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close