जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी मात्र कोपरगाव नजीक येथील संजीवनी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन तरुणीचा (वय-१७) कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथे शहाजापूर येथील आरोपीने स्विफ्ट कार मध्ये येऊन वारंवार पाठलाग करून विनयभंग केला असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे महाविद्यालयीन तरुणीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी तरुणीस साईबाबा कॉर्नर येथे उतरून संजीवनी येथील महाविद्यालयांत ये-जा करावे लागते याचे निरीक्षण करून आरोपी तरुण याने तिच्यावर पाळत ठेऊन तिचा वारंवार पाठलाग करून,”तू,माझेही बोल”,”नाहीतर मी हाताची नस कापून घेऊन जीव देईल” अशी धमकी देऊन तीस जबरदस्तीने कार मध्ये बोलावून तिचे फोटो काढून तिचा हात पकडून तीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिंचा विनयभंग केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी तरुणी हि साकुरी येथील रहिवासी असून ती संजीवनी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.ती साकुरी येथून येऊन-जाऊन करते.तिला साकुरीवरून आल्यावर साईबाबा कॉर्नर येथे उतरून संजीवनी येथील महाविद्यालयांत ये-जा करावे लागते याचे निरीक्षण करून आरोपी तरुण याने तिच्यावर पाळत ठेऊन तिचा दि.२३ नोव्हेंबर रोजी पाठलाग करून,”तू,माझेही बोल”,”नाहीतर मी हाताची नस कापून घेऊन जीव देईल” अशी धमकी देऊन तीस जबरदस्तीने स्विफ्ट कार (क्रमांक माहिती नाही) मध्ये बोलावून तिचे फोटो काढून तिचा हात पकडून तीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिंचा विनयभंग केला आहे.व वारंवार अशी घटना केली आहे.घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य समजून घेतले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गुन्हा.क्रं.४०४/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,३५४(ड),५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.या प्रकरणी पोलीस अधिकारी देसले यांचेशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close