जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेत रंगली कीर्तन स्पर्धा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

    राज्याच्या संत परंपरेचा वारसा,भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि भक्तीचा चिरंतन संदेश नव्या पिढीच्या मनामनात रुजविण्याच्या उद्देशाने,आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये कीर्तन स्पर्धेचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले होते.

   

“कीर्तन ही केवळ कला नसून संस्कार,अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची प्रभावी परंपरा असल्याचे सांगितले.संतांचे विचार केवळ ऐकण्यात नव्हे,तर आचरणात आणण्यातच जीवनाचे खरे सार दडलेले आहे”-ह.भ.प.मोनिकाताई येवले,कीर्तनकार.

  महाराष्ट्राची कीर्तन परंपरा ही संगीत,साहित्य,अध्यात्म आणि लोकप्रबोधनाचा अनमोल ठेवा आहे.यात प्रामुख्याने वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन या दोन मुख्य पद्धती प्रसिद्ध आहेत.संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानले जाते.संत नामदेवांनी ही परंपरा सुरू केली.यात ज्ञानदेवांपासून निळोबापर्यंतच्या संतांच्या अभंगांचे निरूपण केले जाते.याचे स्वरूप सामूहिक असते जिथे श्रोतेही गाण्यात साथ देतात.ही लोकप्रिय पद्धती असल्याने त्याचा राज्याच्या समाजमनावर मोठा पगडा आहे.त्याची माहिती बालकांना व्हावी यासाठी या कीर्तन स्पर्धेचे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले होते.

    इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी अभंग,भारूड,संतवाङ्मय आणि समाजप्रबोधनपर विषयांवर आधारित कीर्तन सादर करत आपल्या ओजस्वी वाणी,प्रभावी निरूपण आणि भावपूर्ण सादरीकरणातून संतविचारांचा प्रभावी जागर घडविला.कॉसमॉस,ओॲसिस,प्लॅटिनम आणि झेनिथ या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली आहे.

   या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.मोनिकाताई येवले आणि मयूर महाराज येवले हे प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून उपस्थित होते.यासह सुहासिनी कोयटे,कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे,प्राचार्य समीर अत्तार तसेच उपप्राचार्या मोहिनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

   आपल्या मार्गदर्शनात ह.भ.प.मोनिकाताई येवले या म्हणाल्या की,”कीर्तन ही केवळ कला नसून संस्कार,अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची प्रभावी परंपरा असल्याचे सांगितले.संतांचे विचार केवळ ऐकण्यात नव्हे,तर आचरणात आणण्यातच जीवनाचे खरे सार दडलेले आहे,असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सत्य,सेवा,सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

  या स्पर्धेसाठी जयश्री श्रीवास्तव,शिल्पा इंगळे,सुजाता वाणी आणि नंदिनी वक्ते या शिक्षकांनी हाऊस मास्टरच्या भूमिकेतून हाऊसच्या विद्यार्थ्यांना आदींचे मार्गदर्शन लाभले होते.यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close