जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

गोदावरी रब्बी आवर्तनाचा बट्याबोळ,नेत्यासह जलसंपदा विभाग सुस्त,शेतकरी हैराण !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

नाशिक जलसंपदा विभागाने या रब्बी आवर्तनात ‘बैल गेला आणि झोपा केला’ या नेहमीच्या आपल्या भोंगळ कारभाराचे अभद्र प्रदर्शन केले असून उशिराने आवर्तन सोडल्याने पिकांचा हंगाम वाया गेल्याने संबंधित पिके सुरकटून गेली आहे.परिणामी सिंचनाचे पाणी घेण्यास व सात क्रमाकांचा फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांनी अनुत्सुकता दाखवल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी शिल्लक राहणार आहे.त्यामुळे उर्वरित पाणी लाक्षेत्रातच वापरावे अशी महत्वपूर्ण मागणी गोदावरी कालवा कृती समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलसंपदाचे कोपरगाव येथील उपविभागीय अभियंता यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक येत्या ०८ मार्च रोजी मुंबई येथील मंत्रालयात आयोजित केली असून त्यात काही विधायक निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची माहिती कालवा कृती समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”जलसंपदाच्या नाशिक विभागाने या हंगामातील घेतलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना ०१ रब्बी व ०३ उन्हाळी आवर्तन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.राज्याचे महसूलमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे विधान भवनात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्राबाहेर संपन्न झाली होती.गत पंधरवाड्यात रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज होती.गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामातील आवर्तन ठरल्याप्रमाणे गत फेब्रुवारी महिन्यात मध्यावर सोडणे गरजेचे होते.मात्र ते सोडण्यास जलसंपदा विभाग खरीप हंगामाप्रमाणे व आपल्या प्रचलित सवयीप्रमाणे तथा अपयशी नियोजना प्रमाणे फोल ठरला आहे.त्यासाठी त्यांनी बारमाही कालवे जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणून सुरु ठेवली आहे.खरे तर त्यांनी एका आवर्तनात कोणते पीक घ्यायचे हे जरी जाहीर केले असते तर बरे झाले असते अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.जर पाटबंधारे खात्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक केली आहे.त्यावर कोणीही नेत्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही हे उघड आहे.

गत तीन वर्षांपासून पुरेसे पर्जन्यमान होऊन व धरणे काठोकाठ भरूनही गोदावरी कालव्यामार्फत पुरेसे पाणी देणार नाही हा ‘पण’ नेते आणि जलसंपदा विभागाने उचलला आहे.त्यामुळे या विपरीत काही होणार नाही असे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे रब्बी आणि उन्हाळ पिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही आणि शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पीक लागणार नाही ही बाब शेतकऱ्यानीं ‘खाली माना घालून’ गृहीत धरायला हवी व आपल्या नेत्यांचे आदेश पाळत राहून,”आलिया भोगासी असावे सादर” म्हणून सहन करणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान याबाबत गोदावरी कालवा कृती समितीने याबाबत आवाज उठवला असून कालवा सल्लागार समितीच्या नागपूर येथील बैठकीत उन्हाळ तीन आवर्तन देणे गरजेचे असल्याचे जाहीर केलं आहे.त्यासाठी धरणात ६.९७४ टी.एम.सी.पाणी धरणात आरक्षित ठेवलेले असून त्याचा कालावधी ७३ दिवसांचा जाहीर केला आहे.मात्र यावर्षी उन्हाळा लवकर आणि कडक असल्याने पिकांना लवकरच पाण्याची गरज निर्माण झाली होती.या हवामान खात्याच्या अंदाजाचा कोणताही परिणाम करून घ्यायचा नाही हे जलसंपदा विभागाने ठरवून टाकले आहे.त्यामुळे रब्बी पिकांची वाट लागली व मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्याला आता कोण जबाबदार आहे हि चर्चा आता नेत्यांच्या व जलसंपदा विभागाच्या दृष्टीने फिजुल ठरणार आहे.परिणामी या व्यवस्थेवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही परिणामी सात क्रमांकाचे फॉर्म भरले गेले नाही हे समजणे गरजेचे आहे.”पाणी आले तर पाहू… ” या अविश्वासाच्या भुमीकेत शेतकरी आले आहे.तर जलसंपदा विभाग,”पाणी मागणी अर्ज आले नाही” या सबबी खाली आपले घोडे दामटताना दिसणार आहे.परिणामी जलसंपदा विभाग मध्येच आवर्तन बंद करून ‘आपले खरे’ ठरवत असताना दुर्दैवाने दिसत आहे.या अविश्वासातून मागील आवर्तन केवळ बारा दिवसात बंद करण्याची या विभागाला नामुष्की आली होती.यावेळी तेच होणार आहे.त्यामुळे पाणी शिल्लक राहणार आहे.तेच शिल्लक पाणी बिगर सिंचन आवर्तन समजून सोडले तर लाभक्षेत्रातील तळे,पाझर तलाव,गावतळी भरून द्यावी परिणामस्वरूप भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.व उन्हाळ्यात शेतकऱ्यांना जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.यातील आवर्तनाचा कालावधी ७३ दिवसापेक्षा कमी करू नये व त्यातील शिल्लक पाणी उन्हाळी आवर्तनात द्यावे अशी मागणी गोदावरी कालवा कृती समीतीने शेवटी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

सदर निवेदनावर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,सेनेचे संपर्क प्रमुख प्रवीण आप्पासाहेब शिंदे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे आदिंच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close