जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांचे सर्वाधिक काम केले-माजी मंत्री जयंत पाटील

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यातील आघाडी सरकारने तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक दीड लाख क्यूबिक मीटर काम तर ३१७ बांधकामे,४५० डिझाईन पूर्ण केले तर.काहींनी कालव्यांवर ५२ घरे बांधले होते त्यांना १.८५ कोटी रुपये खर्च केला तर पाईप तुटीचा १.५ कोटींचा खर्च झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.


  कोरोना कालखंडात सरकारचे उत्पन्न मर्यादित असताना निळवंडे कालव्यांना निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यायचो,त्यासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी कालवा समितीला घेऊन पाठपुरावा केला आहे.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने न्यायिक लढा लढताना त्यांच्या बरोबर आम्ही राहुरी व मुंबईतील मंत्रालयात बैठका घेतल्या व तीन वर्षात हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे”-राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष-जयंत पाटील,माजी जलसंपदा मंत्री.


    उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालव्याचे कामास महाआघाडी सरकारच्या कालखंडात १०५६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सत्कार राहुरी तालुक्याच्या वतीने करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे हे होते.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”अ.’नगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-२ (निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.१४ जुलै १९७० रोजी मिळाली.आजतागायत या प्रकल्पाला बावन्न वर्ष उलटून गेली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी धरणाची भिंत आधी केली आहे.मात्र कालवे बावन्न वर्ष उलटूनही होऊ शकले नव्हते.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील १८२ दुष्काळी गावातील जवळपास ६८ हजार २६४ हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील पुढारी अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम जवळपास २०-२५ टक्के बाकी आहे.आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून या प्रकल्पाच्या कालव्यांना माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या बरोबर घेऊन पुढाकार घेऊन तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अडीच वर्षात सुमारे १०५६ कोटी रुपयांची मोठी आर्थिक तरतूद केली होती.या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील धानोरे,सात्रळ,कानडगाव,गुहा,कणगर,तांभेरे, गणेगाव,चिंचविहिरे,कोल्हार खुर्द,रामपूर आदी गावांच्या वतीने जयंत पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी बोगद्याचे उदघाटन त्यांनी केले आहे.

    सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने माजी मंत्री जयंत पाटील व आ.प्राजक्त तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,सोन्याबापू उऱ्हे सर,नानासाहेब गाढवे,तानाजी शिंदे सर,अड्.योगेश खालकर,गोरक्षनाथ शिंदे,ज्ञानेश्वर हारदे,उत्तमराव जोंधळे,अशोक गांडोळे,शिवाजीराव कोल्हे,मुंजाराम आहेर,रावसाहेब मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


“दरम्यान आपल्या मंत्रिपदाचा कालखंडात आपण वैतरणेसह पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून ते पाणी मुळा धरणात अतिरिक्त पाणी वळविण्याचा समावेश आहे.त्यातून १२ टी. एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात मिळेल”-जयंत पाटील,माजी मंत्री,जलसंपदा विभाग.


     सदर प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भीटे,अरुण कडू,घनश्याम शेलार,साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अविनाश ओहळ,राहुरी पंचायत समितीच्या सभापती मनीषा ओहळ,अविनाश ओहळ,आदिनाथ तनपुरे, सदस्य मुक्ताराम खाटेकर,राहुरी राष्ट्रवादी उपाध्यक्ष संदीप दुसिंग,माजी संचालक साहेबराव दुसिंग,गंगाधर जाधव,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,उपाध्यक्ष सोन्याबापू उर्हे सर,नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,ऍड.योगेश खालकर,रावसाहेब मासाळ,अशोक गांडूळे,ज्ञानेश्वर हारदे,शिवाजीराव कोल्हे,मुंजाराम आहेर सर,तानाजी शिंदे,गंगाधर गमे,ज्ञानेश्वर वर्पे,दादासाहेब पवार,वांबोरीचे सरपंच बंडू पठारे,सरपंच हिराताई हारदे,अलका सिनारे,ऍड.के.एम.पानसरे,किशोर जवरे,जालिंदर लांडे,आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,आपण १९९० सालापासून विधानसभेत काम करतो पण एकदाही निळवंडे या विषयाशिवाय अधिवेशन पूर्ण झाले नाही.सरकारचे उत्पन्न मर्यादित असताना निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यायचो,त्यासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी कालवा समितीला घेऊन पाठपुरावा केला आहे.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने न्यायिक लढा लढताना त्यांच्या बरोबर आम्ही राहुरी व मुंबईतील मंत्रालयात बैठका घेतल्या याची आठवण त्यांनी करून दिली.बाकी मंत्री,लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केले आहे.आपण तीन वर्षात जवळपास १००० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.आगामी काळात अस्तरीकरण करण्याचे काम करावे लागेल कोणतेही सरकार आले तरी काम बंद होणार नाही.असा आशावाद व्यक्त केला आहे.३६५ कोटी अजून शिल्लक आहे.नोव्हेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१९ ते वाजता गायत आमचा काळ आहे.यात दीड लाख क्यूबिक मीटर काम झाल्याचे सांगितले आहे.३१७ बांधकामे केली असल्याचे विषद केले आहे.४५० डिझाईन पूर्ण केले आहे.काहींनी कालव्यांवर ५२ घरे बांधले होते.१.८५ खर्च आला.पाईप तुटीचे १५० खर्च झाला आहे.प्रस्थापित आमदारांनी पाठपुरावा केल्याचे सांगून त्यांची बाजू भक्कम केली आहे.अधिकचा निधी मिळवू असे आश्वासन दिले आहे.अस्तरीकरण आगामी काळात करण्याचे उद्दिष्ट आहे.

   “निळवंडे कालवे होण्यासाठी कालवा समितीचे मोठे योगदान आहे.त्यांनी वेळोवेळी लढे केले त्यात आपणही सामील झालो होतो.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावले आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वेळोवेळी कालव्यांची पाहणी केली त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव येत होता.त्यामुळे गती आली.कोरोनाचा प्रतिकूल कालखंडातही मोठा निधी दिला आहे”-प्राजक्त तनपुरे,माजी राज्य मंत्री,महाराष्ट्र शासन.

    त्यावेळी त्यांनी आमच्याकडे सरासरी १०० टन उसाचे उत्पन्न होते पण प्रवरा काठी केवळ चाळीस ते पंचेचाळीस टन होते याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.आगामी काळात लवकरच पाणी येईल व ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत येईल असे उत्तर एका शेतकऱ्याच्या प्रश्नावर दिले आहे.त्यावेळी माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.व मुळा धरणाखाली एक १८० कोटी रुपयांचा पूल बांधण्याचे काम मंजूर केल्याचे सांगितले आहे.या खेरीज चंद्रपूर जिल्ह्याचे संघटनेचे आ.तनपुरे यांनी चांगले काम केल्याचे कौतुक केले आहे.तुमचे आगामी प्रश्न ते सोडतील असा आशावाद व्यक्त केला आहे.सत्ता येते जाते पण प्राजक्त तनपुरे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले आहे.महाराष्ट्रातील आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीत किमान ३० जागा निवडून येतील असा “इंडिया तुडे”चा सर्व्हेचा उल्लेख केला आहे.निळवंडे कालवा समितीतील सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे त्यांना शेतकऱ्यांनी पाठींबा दिला त्याचे आभार मानले आहे.

  “दरम्यान आपल्या मंत्रिपदाचा कालखंडात आपण वैतरणेसह पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून ते पाणी मुळा धरणात अतिरिक्त पाणी वळविण्याचा समावेश आहे.त्यातून १२ टी. एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात मिळेल”-जयंत पाटील,माजी मंत्री,जलसंपदा विभाग.


   सदर प्रसंगी आ.प्राजक्त तनपुरे बोलताना म्हणाले की,”निळवंडे कालवे होण्यासाठी कालवा समितीचे मोठे योगदान आहे.त्यांनी वेळोवेळी लढे केले त्यात आपणही सामील झालो होतो.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावले आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वेळोवेळी कालव्यांची पाहणी केली त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव येत होता.त्यामुळे गती आली.कोरोनाचा प्रतिकूल कालखंडातही मोठा निधी दिला आहे.कोरोना नसता तर आणखी निधी मिळाला असता.माझ्यापेक्षा माजी खा.प्रसाद तनपुरे यांचा पाठपुरावा केला हे कबूल केले पाहिजे.काहींनी गत विधानसभा निवडणुकीत दोन वर्षात पाणी आणले नाही तर पुन्हा येणार  नाही अशी घोषणा केली होती हे मुद्दाम सांगितले पाहिजे.बोगद्याचे काम होईल की नाही अशी शंका होती.पण ते आता वास्तवात आणले आहे.वन विभागाची अडचण होती ती दूर केली.व काम सुरू केली आहे.पुंछ भागाचे काम सुरू होणार आहे.आपले सरकार येईल असा आशावाद व्यक्त केला व काही लोकांना आसाम मध्ये जाऊन झाडी,डोंगर पाहण्याची घाई झाली होती त्यामुळे चांगले सरकार पाडले.अशी बंडखोरांना कोपरखळी मारली आहे.या सरकारचे खाते वाटप करता येईना व आगामी काळात आपलेच सरकार येईल असा आशावाद व्यक्त केला आहे.व आगामी काळात सरकारने कामे केली नाही तर पुन्हा निळवंडे  कालवा समितीबरोबर येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला आहे.या सरकारने आल्या आल्या जुन्या सरकारचे निर्णय रद्द केले त्यामुळे आपला निधी बराच गेला आहे.
   

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक विजय सिनारे,यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र सोनवणे,सूत्रसंचालन गंगाधर जाधव,तर उपस्थितांचे आभार रवींद्र गागरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close