जलसंपदा विभाग
महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार…या मंत्र्याचे सूतोवाच

न्यूजसेवा-
कोपरगाव-संवत्सर –(नानासाहेब जवरे,शिवाजी गायकवाड)
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक आणि राजकीय कार्यापासून प्रेरणा घेऊन राज्य सरकार लवकरच 90 हजार कोटी रुपये खर्च करून पश्चिम घाटमाथ्यावरील समुद्रास जाणारे पाणी पूर्वेकडील मराठवाडा आणि नगर नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देणार असून त्यावर जलसंपदा विभागाचे मोठे काम सुरू आहे.त्यामुळे दुष्काळमुक्त होणार असल्याचा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

यावेळी संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी बोलताना,”मंत्री राधाकृष्ण विखे हे आमचे नेते आहेत (असे म्हटल्यावर मंत्री विखे हे मिश्किलपणे हसले) ते मानत नाही ती बाब वेगळी आहे” अशी कोपरखिळी मारली आहे.तत्पूर्वी यांनी मला त्यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष कोण आहे अशी विचारणा केली होती यावेळी आपण त्यांना आपले(च?) (ज्ञानेश्वर)परजणे आहे अशी मल्लिनाथी केली होती.त्यावर मंत्री विखे यांनी आपले भाषणात,”या परजणे यांना जसे सांभाळता तसे त्या (राजेश ) परजणेनाही सांभाळा” असा हसत हसत सल्ला दिला होता.त्यावेळी बिपीन कोल्हे यांनी लागलीच आम्ही त्यांना सांभाळतो पण ते जवळच येत नाही अशी कोटी केली असल्याचे दिसून आले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही यात्रा गोदावरी (नाशिक/चोंडी) ते नर्मदा (महेश्वर,मध्य प्रदेश) या दरम्यानची सुमारे ८५० किलोमीटरची यात्रा आहे.या यात्रेत महाराष्ट्रातील 172 प्रमुख नद्यांच्या जलकलशांचे पूजन करून ते चौंडी आणि नाशिक वरून शिर्डी येथे एकत्रित करण्यात आले आणि तिथून यात्रेची सुरुवात झाली आहे.गोदावरी आणि नर्मदा या पवित्र नद्यांना जोडणे आणि राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती रुजवणे हा या यात्रेचा उद्देश मानला जात आहे.त्याचा आज कोपरगाव तालुक्यात तिसरा दिवस होता.त्याचे स्वागत आज साईबाबा चौकात आज राष्ट्रवादीच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर अध्यक्ष बिपीन कोल्हे व त्यानंतर संवत्सर ग्रामपंचायत या ठिकाणी गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान या जलदिंडीचा संवत्सर येथे जाण्याचा प्रवास मार्ग हा संजीवनी मार्गे रस्ता खूपच खराब असल्याने तो ताफा मनाई मार्गे वळविण्यात आला होता.या मार्गाने हा ताफा जाणार असल्याने प्रशासन कधी नव्हे इतके गतिमान झाले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी त्या मार्गावरील दुतर्फा साईड पट्ट्यावर मुरूम टाकून पूर्ण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.मात्र त्या मार्गाने जाताना संजीवनी कारखान्याचे आग्नेय बाजूने प्रदुषित नाल्यांचा सामना या ताफ्यास करावा लागला आहे.त्यामुळे मराठवाड्यास दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे.मात्र या दूषित जल प्रवाह आणि त्यामुळे दूषित होणारी गोदावरी नदी यावर मंत्री विखे काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सदर प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे,आ.आशुतोष काळे,राज्यसभेचे खा.रामदेव वडकुते,आ.गोपीचंद पडळकर,माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान,संचालक बाळासाहेब वक्ते,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,शंकर चव्हाण,धर्मचंद बागरेचा,काकासाहेब जावळे,संजीवनीच संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सभापती शिवाजी वक्ते,विश्वास महाले,पांडुरंग शिंदे,विजय आढाव,माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान नाशिक येथील मुख्यमंत्री फडणवीस यांचे बैठकीत प्रदुषित गोदावरी नदीवर मोठा खल झाला आहे.त्यावर उपाययोजना सुचवल्या आहेत.मात्र त्या मार्गाने जाताना संजीवनी कारखान्याचे आग्नेय बाजूने प्रदुषित नाल्यांचा सामना या ताफ्यास करावा लागला आहे.त्यामुळे मराठवाड्यास दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे.मात्र या दूषित जल प्रवाह आणि त्यामुळे दूषित होणारी गोदावरी नदी यावर मंत्री विखे काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”दुष्काळी भागाला पाणी देण्याचे पूर्वीचे सत्ताधारी केवळ स्वप्न दाखवत होते.मात्र प्रकल्प पूर्ण करत नव्हते.त्यासाठी त्यांनी निळवंडे प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे.याप्रकल्पासाठी सत्ताधाऱ्यांनी (पण ते कोण होते हे सविस्तर बोलण्याचे टाळले आहे) पस्तीस वर्षे लावली (वास्तविक निळवंडे प्रकल्पास येत्या 14 जुलै रोजी 56 वर्षे होत आहे,नेत्यांचे गणित किती पक्की आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे) असल्याचा आरोप केला आहे.अहिल्यादेवी यांनी त्यांच्या काळात विहिरी,बारव निर्माण करून मोठे कार्य करून त्यांनी जनतेप्रती सेवाभाव दाखवून दिला असल्याचे सांगितले आहे.त्यावेळी आगामी काळात गोदावरी खोऱ्यात जवळपास 70टीएमसी पाणी आपण वळवणार आहे.येत्या काही दिवसात आपण वीस टीएमसी पाणी वाढवळे असल्याचे सांगितले आहे.याशिवाय जायकवाडी आणि उजनी या प्रकल्पांमधील प्रत्येकी वीस टीएमसी इतके पाणी साठा वाढेल इतका गाळ काढणार असल्याचे सांगितले आहे.आज एक टीएमसी पाणी निर्माण करायला जवळपास 01 हजार कोटी रुपयांचा खर्च येतो त्यादृष्टीने या प्रकल्पांमधील गाळ काढला तर जवळपास 40 टीएमसी पाणी निर्माण होणार आहे.शिवाय शेतकऱ्यांना मोफत गाळ दिला जाणार असल्याचा दावा केला आहे. ही जलयात्रा केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता, “पाणी हीच जीवनरेखा” या जाणिवेला समाजमनात दृढ करणारी परिवर्तनाची चळवळ ठरणार आहे.वारंवार पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक नागरिकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा,यासाठी ही जलयात्रा प्रेरणादायी ठरेल. शासन,प्रशासन आणि जनसहभाग यांच्या एकत्रित शक्तीतून जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन घडवत,भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध जलभविष्य निर्माण करण्याचा ठाम संदेश या उपक्रमातून दिला जाणार असल्याचे असून शेवटी साईबाबांची श्रवणमंजिरी ज्या ठिकाणी लिहिली ते ठिकाण महेश्वरी हे असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले आहे.

दरम्यान जलसंपदा मंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास पस्तीस ते चाळीस वाहने सामील असल्याचे दिसून आले आहे.मात्र या सर्व बस व तत्सम वाहनांचे क्रमांक विशेषतः परप्रांतीय म्हणजेच अरुणाचल (ए.आर.)सुरू होणारे असल्याचे दिसून आले आहे.त्याखालोखाल (डी.डी.) ने सुरू होणारे होते.त्यामुळे याचे इंगित काय आहे याचा खुलासा होऊ शकला नाही.एरव्ही प्रांत वादावर टोकदार बोलणारे पक्ष सत्तेत असताना महाराष्ट्रातील वाहनाना यात संधी का दिली नाही असा सवाल निर्माण झाला आहे.
यावेळी आ.गोपीचंद पडळकर म्हणाले की,यात्रेचा तिसरा दिवस आहे.मंत्री राधाकृष्ण विखे हे आमचे सलग बरोबर आहे.राज्यातून पहिल्यांदा अशी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशी यात्रा निघत आहे.महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त होणार असल्याचा दावा केला आहे.अहिल्यादेवी यांचा जन्म अहिल्यानगर मधील चौंडी येथील आहे.त्यांचे मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्या बरोबर लग्न झाले होते.खंडेराव यांच्या मृत्यूनंतर त्या सती जायला निघाल्या त्यावेळी मल्हारराव होळकर यांनी दुर्गावमी विचार करून त्यांना नकार दिला आहे.अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी मालेगाव,चांदवड आदी गावे त्यांनी वसवले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचेनंतर अहिल्यादेवी यांनी पाणी व्यवस्थेवर सर्वात मोठे काम केले आहे.हा आपल्या गौरव वाटावा अशी घटना आहे.एका वर्षात भाजप सरकारने अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले होते.आजपर्यंत सत्ताधारी वर्गाने पाण्याचा वापर हत्यार म्हणून वापर केला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल असे आश्र्वासित केले आहे.

यावेळी संवत्सर या ठिकाणी बोलताना आ.गोपीचंद पडळकर यांनी संवत्सर गावाला राधाकृष्ण विखे यांचे रूपाने चांगले जावई लाभले आहे.त्यांनी गावच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.त्याचे प्रत्यंतर आजच्या स्वागतसमारंभात दिसून येत असल्याचे कौतुकोद्गार काढले असल्याचे दिसून आले आहे.तर राजेश परजणे यांनी राज्यसभेचे खा.रामदेव वडकुते आणि आपण महानंद डेअरी मध्ये बरोबर काम केले असून सरकारने त्यांचे कामाची पावती त्यांना राज्यसभेच्या खासदारकीच्या रूपाने दिली असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान या जलदिंडीचे स्वागत प्रथम साईबाबा चौकात आ.आशुतोष काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.त्यानंतर हा ताफा संजीवनीच्या दिशेने गेला होता.त्याठिकाणी बिपीन कोल्हे यांनी या जलदिंडीचा रथाचे पूजन केले आहे.तर संवत्सर या ठिकाणी जिल्हापरिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी पूजन केले असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान जुना नागपूर-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक असतानाही संवत्सर शिवारात गोदावरी नदीवर असलेला पूल नादुरुस्त होऊन अनेक महिने उलटूही तो संगमनेर सार्वजनिक बाधकाम विभागाने तो अद्याप पूर्ववत केलेला नाही त्यामुळे संवत्सर आणि परिसरातील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे व तो कधी पूर्ण करणार असा सवाल विचारला आहे.
यावेळी संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी बोलताना,” पाणपोईच्या जनक राजमाता अहिल्यादेवी होळकर या असल्याचे प्रतिपादन केले आहे.त्यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे हे आमचे नेते आहेत (असे म्हटल्यावर मंत्री विखे हे मिश्किलपणे हसले) ते मानत नाही ती बाब वेगळी आहे.अशी कोपरखिळी मारली आहे.तत्पूर्वी यांनी मला त्यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष कोण आहे अशी विचारणा केली होती यावेळी आपण त्यांना आपले(च) (ज्ञानेश्वर)परजणे आहे अशी मल्लिनाथी केली होती.त्यावर मंत्री विखे यांनी आपले भाषणात या परजणे यांना जसे सांभाळता तसे त्या (राजेश ) परजणे यांनाही सांभाळा असा हसत हसत सल्ला दिला होता.त्यावेळी बिपीन कोल्हे यांनी लागलीच आम्ही त्यांना सांभाळतो पण ते जवळच येत नाही अशी मिश्किल टिपणी करून कोटी केली असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी उपस्थिती व्यासपीठ आणि उपस्थित कार्यकर्त्यांत हास्याचे फवारे न उडाले तर नवल होते.
दरम्यान या जलदिंडीचा संवत्सर येथे जाण्याचा प्रवास मार्ग हा संजीवनी मार्गे रस्ता खूपच खराब असल्याने तो ताफा मनाई मार्गे वळविण्यात आला होता.या मार्गाने हा ताफा जाणार असल्याने प्रशासन कधी नव्हे इतके गतिमान झाले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी त्या मार्गावरील दुतर्फा साईड पट्ट्यावर मुरूम टाकून पूर्ण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.मात्र त्या मार्गाने जाताना संजीवनी कारखान्याचे आग्नेय बाजूने प्रदुषित नाल्यांचा सामना या ताफ्यास करावा लागला आहे.त्यामुळे मराठवाड्यास दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे.मात्र या दूषित जल प्रवाह आणि त्यामुळे दूषित होणारी गोदावरी नदी यावर मंत्री काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान जलसंपदा मंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास पस्तीस ते चाळीस वाहने सामील असल्याचे दिसून आले आहे.मात्र या सर्व बस व तत्सम वाहनांचे क्रमांक विशेषतः परप्रांतीय म्हणजेच अरुणाचल (ए.आर.)सुरू होणारे असल्याचे दिसून आले आहे.त्याखालोखाल (डी.डी.) ने सुरू होणारे होते.त्यामुळे याचे इंगित काय आहे याचा खुलासा होऊ शकला नाही.एरव्ही प्रांत वादावर टोकदार बोलणारे पक्ष सत्तेत असताना महाराष्ट्रातील वाहनाना यात संधी का दिली गेली नाही असा सवाल निर्माण झाला आहे.शिवाय या ताफ्यात कानडी लोकांचा मोठा भरणा असल्याचे दिसून आले आहे.मंत्र्यांच्या दौऱ्याला महाराष्ट्रातील वाहने मिळाले नाही की काय असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली असल्याचे दिसून आले आहे.



