जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कोपरगांवात साजरी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   हिंदू महासभेचे अध्यक्ष,थोर क्रांतिकारक,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच,महाराष्ट्र प्रांत,धर्मयोध्दा माजी खा.स्व.भिमराव बडदे स्मृती प्रतिष्ठाण,महाराष्ट्र प्रांत,कोपरगांव शाखा आणि स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने सावरकर चौक कोपरगांव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

कोपरगाव शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी झाली तो क्षण.
   स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर हे एक महान क्रांतिकारक,समाजसुधारक आणि लेखक होते.त्यांचे जीवन राष्ट्रभक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते.त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी नाशिक येथे 'अभिनव भारत' ही पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अनेक वर्षे काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगली.ते हिंदू राष्ट्रवादाचे प्रणेते,विज्ञानवादी आणि सामाजिक सुधारक होते. 

   स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती दरवर्षी २८ मे रोजी साजरी केली जाते.१८८३ मध्ये नाशिकजवळील भगूर येथे जन्मलेले सावरकर एक महान क्रांतिकारक,समाजसुधारक आणि लेखक होते.त्यांचे जीवन राष्ट्रभक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते.त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी नाशिक येथे ‘अभिनव भारत’ ही पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अनेक वर्षे काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगली.ते हिंदू राष्ट्रवादाचे प्रणेते,विज्ञानवादी आणि सामाजिक सुधारक होते.त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी मोठे प्रयत्न केले.त्यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात संपन्न होते.कोपरगाव येथे विविध संघटनेच्या वतीने ती आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

  सदर प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास खैरे,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,स्वच्छतादूत सुशांत घोडके,अनिल पारख,ॲड.संजय मंडलिक,सुनील गोखले,प्रमोद पाटील,रामचंद्र बागरेचा,निलेश साबळे,देविदास कोळपकर,राजेंद्र कुदळे,गिरीश हिवाळे,किरण आव्हाड,एकनाथ हिवाळे,अनिल काले,तुषार बागरेचा,राजकुमार  हलवाई,सुरेश कांगुणे,अमोल हलवाई,रितेश कुदळे,नितीन काले,सोमनाथ व्यवहारे,गोविंदराम चावला,सादिक शेख,सुरेश भोईर,राजेंद्र खैरे,अनिल वायखिंडे,हेमंत कांगुणे,बी. डी.कुलकर्णी यांचेसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

   प्रारंभी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे प्रतिमापुजन करून करण्यात आले.या प्रसंगी सावरकर यांच्या विविध घोषणांनी मोठा जयघोष करण्यात आला.यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच महाराष्ट्र प्रांतचे वतीने सुमारे ११०० नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close