जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

….या तालुक्यात शिवजयंती उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.भाजप माजी आ.कोल्हे गट आणि आ.आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंती निमित्त कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आहे.तर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.माजी आ.अशोक काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अभिवादन केले आहे.तालुक्याचा ग्रामीण भागही अपवाद नव्हता.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्यावेळी माजी आ.अशोक काळे व सहकारी दिसत आहेत.

सन-१८६९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला होता.जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती.परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उत्सव देशभर पसरला आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात तो उत्साहात संपन्न झाला आहे.

  

भाजप कोल्हे गटाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ७ मधील छत्रपती श्री शिवाजीनगर येथे असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.हा सण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.आज संपूर्ण जगात हा उत्सव भव्य प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.सन -१८६९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला होता.जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती.परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाऊन पोहोचला.आता तो भारतभर आणि विदेशात जाऊन पोहचला आहे.कोपरगाव शहर आणि तालुका याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात तो आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

   कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (आ.काळे गटाचे वतीने) पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले आहे.यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व अन्य सहकारी. 

   कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (आ.काळे गटाचे वतीने) पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले आहे.यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,मेहमूद सय्यद,जनार्दन कदम,सोमनाथ आढाव,शैलेश साबळे,इम्तियाज अत्तार,बाळासाहेब रुईकर,रमेश गवळी,युवा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव,शिवाजी खांडेकर,बाळासाहेब आढाव,दिनकर खरे,विजय त्रिभुवन,सचिन गवारे,राजेंद्र जोशी,भाऊसाहेब भाबड,सुनिल बोरा,सचिन ठोळे,प्रकाश दुशिंग,आकाश डागा,मनोज नरोडे,राजेंद्र आभाळे,डॉ.तुषार गलांडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

 

  छत्रपती शिवजयंती उत्सव कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीच्या आवारात छत्रपतींना विनम्र अभिवादन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि त्यांचे सहकारी दिसत आहे.

  

  कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ७ मधील छत्रपती श्री शिवाजीनगर येथे असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असल्याचा दावा करून त्यांनी या परिसरातील नगरपरिषद गटनेते नगरसेवक प्रसाद आढाव व नगरसेविका सोनल अजमेरे यांच्या पुढाकाराने या उद्यानाच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्यान परिसरात अभिवादन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती उपबद्ध झाली आहे.त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिवजयंती निमित्त दिल्ली येथे प्रथम पुरस्कार मिळवलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने लक्ष वेधून घेतले तो क्षण.

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.त्यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलसह आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांनी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे.त्यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,गटनेते प्रसाद आढाव,आदींसह बहुसंख्य नगरसेवक नागरिक उपस्थित होते.

   

  या प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,दत्तात्रय जगताप,डॉ.अमोल अजमेरे,गटनेते प्रसाद आढाव,नगरसेविका सोनल अजमेरे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,नगरसेविका विद्या सोनवणे,वैभव गिरमे,डॉ.अमोल अजमेरे,नारायण अग्रवाल,मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच परिसरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त उपस्थित मान्यवर दिसत आहे.

   दरम्यान शिवजयंती उत्सव कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीच्या आवारात छत्रपतींना विनम्र अभिवादन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अभिवादन केले आहे.त्यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,गट शिक्षणाधिकारी शबाना शेख,प्रशासन अधिकारी राजेश डोंगरे,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबनराव वाघमोडे,संतोष नलगे,कालीप्रसाद कुरे,कल्पना सोनवणे,सीमा जमदाडे,दीपिका कवचे,भाग्यश्री सोनकांबळे,श्रीमती शिंगाडे,शुभम टाके,प्रदीप चव्हाण आदीसह बहुसंख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत सर्व ग्रामस्थांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत सर्व ग्रामस्थांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तो क्षण.

  यावेळी सुरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सुमन वाल्मिक कोळपे,उपसरपंच सीमा दीपक कदम,ग्रामपंचायत सदस्य महेश निकम,दादा जगताप,दिलीप शर्माळे,सविता शर्माळे, देवराज कदम,राजेंद्र केरू मेहरखाब,माजी उपसरपंच सुनील कोळपे,राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अंबादास धनगर,तंटामुक्ती अध्यक्ष माजी उपसभापती वाल्मीक कोळपे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यशवंत निकम,कृषी मित्र कैलास कदम उद्योजक हेमंत वाबळे,अण्णा वाबळे,विशाल लोंढे,माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत वाबळे,नाना भवर,अशोक सोनवणे,दीपक कदम,अरुण लोंढे,तंटामुक्ती सदस्य मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मोतीराम निकम,पत्रकार सिद्धार्थ मेहरखांब,माणिक उगले आदी मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close