क्रीडा विभाग
शिर्डीच्या ओंकार कोल्हेचे जागतिक यश

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिर्डी येथील एस.एस.एस.टी.महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार कोल्हे याने नुकत्याच दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या आय.यू.के.एल.केटलबेल स्पोर्ट वर्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील वेस येथील अरुण भानुदास कोल्हे यांचे ओंमकार कोल्हे हे चिरंजीव आहे.त्यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे शिर्डी येथे प्रशिक्षक आंशु तारावत यांच्या मार्गदर्शनाखाली केटल बेल जागतीक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक चंदेरी पुरस्कार मिळवले आहेत.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यू.के.एल.केटलबेल स्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप ही केटलबेल लिफ्टिंग मधील जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.या खेळाचे जागतिक स्तरावर नियंत्रण इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग (आय.यू, के.एल.) या संस्थेकडे आहे.४ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर IUKL वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ यशस्वीरित्या पार पडली.या स्पर्धेत जगातील १२ पेक्षा जास्त देशांतील सुमारे ३०० हून अधिक ॲथलीट्सनी सहभाग घेतला होता.भारतात या खेळाला मिळणारी लोकप्रियता वाढते आहे. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.त्यात ओंकार कोल्हे याने हे लक्षवेधी यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत 4 ते 9 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 20 पेक्षा जास्त देशातील खेळाडू सहभागी झाले होते.ओंकारने 63 किलो वजन गटात, यू-23 गटात 24 किलो वजनाची केटलबेल 78 वेळा उचलत पहिला क्रमांक पटकावला आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याला आंतरराष्ट्रीय निरीक्षक व्हॅलेंटाईन एग्रो यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे.