जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत मुलींना सुवर्ण,तर मुलांना रौप्य पदक

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   ओरिसा राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथील प्रसिध्द किट विदयापीठाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या लक्षवेधी खेळाच्या जोरावर मोठी कामगिरी केली आहे.या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दिमाखात सुवर्णपदक  पटकावले आहे,तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

३१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मोठी कामगिरी केली आहे.
  दरम्यान खेळाडूंची जिद्द,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रशिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच हे सुवर्ण आणि रौप्य पदक आपण मिळवू शकलो.सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मार्गदर्शकांचे आपण मनःपूर्वक अभिनंदन करतो अशा शब्दांत महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन'चे महासचिव राजेंद्र इखणकर यानी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

   याबाबत सविस्तर माहिती अशी की,”दिनाक २४ मे ते २९ मे या कालावधीत ३१ वी राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात भुवनेश्वर येथे पार पडली आहे.त्यात
वैयक्तिक पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राने आपला दबदबा राखला असल्याचे उघड झाले आहे.सांघिक यशासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कौशल्याने संपूर्ण स्पर्धचे लक्ष वेधून घेतले होते.कु.अस्मि राऊत मुलींचा संघ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट,यश शिंदे मुलांच्या गटात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट चा बहुमान पटकावला आहे.तर आर्या चव्हाण मुलींचा संघ उत्कृष्ट कामगिरीसाठी,बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा फायदा दोन्ही संघांना राष्ट्रीय पातळीवर सज्ज करण्यासाठी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अत्यंत मोलाची ठरली आहे.

दरम्यान मुलींच्या संघाला लाभलेल्या प्रशिक्षक आरती भगत आणि रिया आगवणे या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत.तर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून अहिल्यानगर येथिल सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट हे स्वतः राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत.या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात मजल मारत हे मोठे यश संपादन केले आहे.महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र आव्हाड तसेच सचिव राजेंद्र इखणकर यांनी दोन्ही संघांच्या या अभूतपूर्व कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.यामहाराष्ट्राच्या मुला-मुलींनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचा असल्याचे बोलेले जात आहे.

   दरम्यान खेळाडूंची जिद्द,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रशिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच हे सुवर्ण आणि रौप्य पदक आपण मिळवू शकलो.सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मार्गदर्शकांचे आपण मनःपूर्वक अभिनंदन करतो अशा शब्दांत महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन’चे महासचिव राजेंद्र इखणकर यानी खेळाडूंचे कौतुक केले आहे.महाराष्ट्राच्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण राज्यातील क्रीडा क्षेत्रातून खेळाडूंचे कौतुक होत आहे.या संघामध्ये अहिल्यानगर येथिल अंजली दीपक खवले,रईसा जावेद शेख,आदित्य संदीप काळे या खेळाडुनी चांगली कामगिरी केली आहे.

    महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन महासचिव राजेंद्र इखणकर,उपाध्यक्ष इंद्रजित नितीनवार,टेक्निकल कमिटीचे अध्यक्ष अशोक सरोदे,राज्य असोसिएशन चे सहसचिव अहिल्यानगर जिल्हा बेसबाँल असोसिएशन’चे सचिव मकरंद को-हाळकर,अहिल्यानगर जिल्हा बेसबाँल असोसिएशन चे अध्यक्ष अरुण चंद्रे,उपाध्यक्ष सुधिर चपळगावकर, सहसचिव कल्पेश भागवत,रिजवान पठाण,अहिल्यानगर आँलिपिक असोसिएशन’चे  सचिव शैलेश गवळी,महाराष्ट्र सायकलिंग असोचे संजय साठे,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर,उपाध्यक्ष प्रदीप साखरे,आदीनी  या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close