जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील कराच्या नोटिसा रद्द करा-भाजप,राष्ट्रवादीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत नुकत्याच जरी करण्यात आलेल्या कारच्या अवाजवी नोटिसा रद्द कराव्या अशी मागणी कोपरगाव भाजप निष्ठावान गटासह राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना भेटून केली आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

दरम्यान आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शहर राष्ट्रवादीने आज कोपरगाव नगरपरिषदेत जाऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे व कोरोना काळात नागरिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे हि करवाढ अन्याय कारक आहे असा दावा करून सदर कर वाढ रद्द न केल्यास आपण आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

कोपरगाव शहर झपाट्याने वाढणारे शहर म्हणुन ओळखले जाते.शिर्डी नजीक असल्याने या शहरात जागेचे दर वाजवी असल्याने शिर्डी आणि परिसरात नोकरी आणि अन्य व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची या शहरात जागेची मागणी वाढत चालली आहे.त्यामुळे शहराची भौगोलिक आकारमान मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे.

मात्र कोपरगाव नारपरिषदेने नुकत्याच महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ११९(१)(२) अन्वये मालमत्ता कराच्या वाढीव दराने नोटिसा काढल्या आहेत.त्यात सन-२०२२-२३ ते २०२६-२७ असा कालावधी दर्शवला आहे.करयोग्य क्षेत्रफळ,करयोग्य मूल्य,संकलित कर,विशेष शिक्षण कर,अग्निशामक कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,वृक्ष कर,असे अवाजवी कर लावल्याचा नागरिकांचा आरोप आहे.त्या नोटीसीत नावात काही बदल,चूक,कोणतीही हरकत असल्यास पालिका मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविण्यास सांगितले आहे.व त्यासाठी अखेरची मुदत ३ ऑक्टोबर २०२२ अशी दिली आहे.

“नगरपरिषदेच्या अखेरच्या सर्वसधारण सभेत या विषयावर वादंग होऊन हा विषय सर्वसंमतीने फेटाळून लावला आहे.त्यामुळे हा विषय संपला असताना पुन्हा एकदा नागरिकांना नोटिसा येणे खेदजनक आहे.त्या रद्द करून नागरिकांना जगणे सुसह्य करावे”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगर परिषद.

निर्धारित वेळेत आपली काहीही हरकत न आल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून प्रस्तावित कर आपल्यास मान्य आहे समजून पुढील प्रस्तावित कर आकारणीची कार्यवाही करण्यात येणार आहे.सदर कर आकारणीची माहिती नगरपरिषद कार्यालयांत पाहण्यास ठेवण्यात आली आहे.त्यामुळे शहरात नागरिकांचा रोष वाढला आहे.

त्यामुळे ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यातून निवेदने तक्रारी वाढल्या आहेत.त्यातच कोपरगाव शहर भाजपने नुकतीच नगरपरिषदेत धाव घेऊन आपले लेखी म्हणणे मांडले आहे.त्यात त्यांनी म्हटलं आहे की,”नगरपरिषदेच्या अखेरच्या सर्वसधारण सभेत या विषयावर वादंग होऊन हा विषय सर्वसंमतीने फेटाळून लावला आहे.त्यामुळे हा विषय व नोटिसा रद्द करून नागरिकांना जगणे सुसह्य करावे अशी मागणीही शेवटी भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,खैरे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,सोशल मीडिया सेलचे उत्तर विभाग प्रमुख समीर आंबोरे,पाटील किरण थोरात,नंदकिशोर जोशी,प्रमोद पाटील सर,योगेश वाणी,भारतीय पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश कृष्णाणी,विनित वाडेकर,रवींद्र कोऱ्हाळकर,संजय कांबळे,विजय बडजाते,सुरेश कंगोणे,चेतन खुबाणी,राजेंद्र खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,धरमचंद बागरेचा,विरेन बोरावके,मंदार पहाडे,कृष्णा आढाव,कार्तिक सरदार,अशोक आव्हाटे,आकाश डागा,ऋषिकेश खैरनार,फिरोज पठाण योगेश नरोडे,सचिन गवारे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close