कोपरगाव शहर वृत्त
…या उत्सवास शाळांचा मोठा प्रतिसाद !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने गुढीपाडवा ते श्रीराम नवमी पर्यन्त आयोजित केल्या जाणाऱ्या भक्तिमय सत्संग सोहळ्या अंतर्गत या वर्षी श्री नवनाथ कथासार आयोजित केले आहे.मुख्य कार्यक्रमासोबत नानाविध उपक्रम आयोजित केले जात असून त्याला कोपरगाव येथील शाळांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले आहे.

कोपरगावात भक्ति शक्ति संस्कार संगम या शिबिरा अंतर्गत रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत शास्त्रोक्त पद्धतीने योगतज्ञ प्रज्वल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून सूर्य नमस्कार करून घेण्यात आले आहे.तसेच त्यानंतर गीता परिवाराच्या वतीने श्रीमद भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे अनुपठण करण्यात आले आहे.
कोपरगाव शहरात यापूर्वी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या श्री साईगाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी भाविकांना धुंडिसुत मालू कवी विरचित “श्री नवनाथ भक्तिसार ” या कथेची मेजवानी हरिद्वार येथील प्रसिद्ध आचार्य शिरीषजी महाराज यांच्या मुखर्विंदातून संपन्न होत आहे.त्याबरोबर तरुण मंडळाने विविध उपक्रम सुरू केले असून त्यात या वर्षी सनातन संस्था व गीता परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसा यावर आधारित प्रश्न मंजूषा आयोजित केली आहे.त्यासाठी कोपरगांव शहर व परिसरातील विविध शाळांमधील गट-अ श्री रामरक्षा (५ वी ते ७ वी) साठी विदयार्थी २७४८ तसेच गट-ब श्री हनुमान चालीसा (८ वी ते ९ वी) साठी विदयार्थी २७४४ अशा सुमारे ५४९२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या स्पर्धेचा निकाल श्री ज्ञानेश्वरनगरी,तहसील मैदान कोपरगांव येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज आणि आत्मा मलिक ध्यानपीठाचे परमानंद महाराज यांच्या हस्ते तसेच विविध क्षेत्रातील संतगण आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला आहे.तसेच भक्ति शक्ति संस्कार संगम या शिबिरा अंतर्गत रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत शास्त्रोक्त पद्धतीने योगतज्ञ प्रज्वल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून सूर्य नमस्कार करून घेण्यात आले आहे.तसेच त्यानंतर गीता परिवाराच्या वतीने श्रीमद भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे अनुपठण करण्यात आले आहे.या संस्कार शिबिरासाठी कोपरगांव शहर परिसरातील व आत्मा मलिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले तसेच कोपरगावातील योग प्रचार संस्थेच्या महिलांनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला आहे.हा कार्यक्रमानंतर प्रश्न मंजूषा व सूर्यनमस्कार साठी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली आहे.


