जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

निवडणूक संपली,अतिक्रमण विरोधी हातोडा कोसळला !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्यातील नगरपरिषदेच्या निवडुका संपल्या असून आपल्या प्रिय मतदारांना चंद्र,तारे देण्याची वेळही संपली आहे,मतदार आणि त्यांचे पाठीराखे आता हवेत विरले आहेत त्यामुळे कोणालाही विश्वासात न घेता नगरपालिकेने कारवाई करून अतिक्रमण विरुद्ध मोहीम राबवली असून अनेकाना रस्त्यावर आणले असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

शहरातील अतिक्रमण मोहीम सुरू असतानाचे क्षण.(पहिले छायाचित्र संग्रहित)

“व्यापारी म्हणून शहरातील व्यावसायिक मोठी गुंतवणूक बांधकाम करतात शिवाय आम्ही नगरपालिकेला कर भरतो आणि आमच्या पुढे कोणी हातगाडी लावून व्यवसायाचे नुकसान करत असेल तर आणि आपला गल्ला भरत असतील तर ते चुकीचे आहे,पालिकेने हे प्रकार टाळायला हवे”-उमेश धुमाळ,व्यापारी,कोपरगाव शहर.

  कोपरगाव नगरपरिषद आणि अतिक्रमण हा तसा सत्ताधारी आणि प्रशासनाचा जुना आणि आवडता आणि मोठ्या कमाईचा विषय मानला जातो.त्यामुळे नगराध्यक्ष,पदाधिकारी,नगरसेवक आदींचा हा विषय विशेष आवडीचा मानला जात आला आहे.त्यामुळे यापूर्वी अशाच अतिक्रमणाची कारवाई माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी आयुक्तांना दिनाक १० मार्च २०११ रोजी करण्यास भाग पाडले होते.त्यात ०२ हजाराहून अधिक दुकाने,टपऱ्या आणि छोटी मोठी दुकाने हटवली होती.त्यावर अनेक राजकीय नेत्यांची मते मिळवण्याची सोय झाली.अनेकांनी निवडणुका पाहून रांगोळ्या काढून मतांची लयलूट केली हा काही फार जुना विषय नाही.अजूनही अधून मधून काही नेत्यांना निवडणुका पाहून या अतिक्रमण धारकांची आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची उबळ येत असते.नुकत्याच २० डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या निवडणुकीत ही आश्वासने विविध पक्षांच्या नेत्यांनी दिली होती.त्यांच्या बातमीची शाई अद्याप वाळलेली नाही.आणि आज एकदम नगरपरिषदेने गोदावरी नदीच्या छोट्या पुलाजवळून अतिक्रमण विरोधी कारवाईचा हातोडा सुरू केला आहे.त्यात अनेक जण घायाळ झाले आहे.त्यात उबाठा सेनेचे तालुकाध्यक्ष भरत मोरे,सतीश काकडे आदींसह अनेकांनी यांचा कैवार घेणे सुरू केले आहे.वास्तविक कोणतेही अतिक्रमण हे शेवटी जनतेला वेठीस धरण्याचे साधन मानले जाते आणि त्यातून आधीच गज दोन गज उरलेल्या रस्त्यावर नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत असते.त्यातच अतिप्रिय  मोकाट जनावरे आणि त्यांच्या मालकांना धक्का लावायचा नाही ही पालिकेने शपथ खाल्ली असल्याने कर भरणारे व्यापारी आणि नागरिकांना पालिका दुय्यम ठरवून त्यांचेकडून या अतिक्रमणाची वसुली केली जाते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अतिक्रमण मोहिमेत गोळा केलेले साहित्य घेऊन जाताना पालिका वाहन.

“भाजप कोल्हे गटाने नगरपरिषद निवडणुकीत विस्थापिताना आपण पुन्हा एकदा गाळे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करू असे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्याचा आरोप करून या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी अतिक्रमणे काढले होती.मात्र दोन वर्षात पुन्हा पूर्ववत ते झाले आहे.याला दोषी कोण आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,व्यापारी महासंघ व राष्ट्रवादी नगराध्यक्षपदाचे उमेदवार.

   शहरात अतिक्रमण करण्यास आणि त्यांना जागा देऊन बसविण्यास नगरसेवक आणि  माजी नगरसेवक आणि त्यांचे गाठोडे ठेवण्यास जागा देणारे अधिकारी यांना हप्ते राजरोस सुरू असतात हे सत्य दडून राहिलेले नाही.सन-२०११ च्या अतिक्रमण मोहिमेनंतर अनेकांचा रोजगार बुडाला हे सांगण्याची गरज नाही.आज ही कारवाई सुरू झाल्याने अनेकाना धक्का बसला आहे.काहींनी तर शहरातील काही अल्पसंख्याकांनी सत्ताधारी भाजपला मते न दिल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली असल्याची आवई उठवली आहे.खरे खोटे त्यांनाच माहिती.मात्र कोणतेही आणि विशेषता सत्ताधारी गटाला डावलून अतिक्रमण मोहीम सुरू झाली यावर कोणी विश्वास ठेवील अशी वर्तमान स्थिती नाही.तरीही आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”सदर अतिक्रमण धारकांना माहे ऑक्टोबर २०२५ मध्ये म्हणजेच निवडणुकीआधी नोटीस दिल्या होत्या.मात्र नंतर निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाल्याने ही कारवाई स्थगित केली होती.

अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यानंतर अतिक्रमित व्यापारी आपले साहित्य काढून घेताना दिसत आहे.

“या अतिक्रमण मोहिमेची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती अशी बचावात्मक भूमिका घेऊन अतिक्रमण धारकांचे दूरध्वनी आल्यावर आम्हाला ही मोहीम कळाली आहे.आपण याबाबत मुख्याधिकारी जगताप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकारी आगामी ०४ फेब्रुवारी रोजी येणार असल्याचे ही कारवाई केली असल्याचे सांगितले आहे.यापूर्वी अंबिका पान स्टॉल समोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी वाहतुकीत अडकली होती त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहे”-पराग संघान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  आता जिल्हाधिकारी यांचा आगामी बुधवार दिनाक ०४ फेब्रुवारी रोजी दौरा असल्याने व याआधी त्यांना कोपरगाव शहरात वाईट अनुभव आल्याने त्यांनी शहरातील सर्वच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती हाती आली आहे.ही कारवाई कोणाही राजकीय नेत्याच्या दबावातून सुरू केलेली नाही असा खुलासा करून ती या पुढेही ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे सूतोवाच केले आहे.याबाबत आपण नगराध्यक्षासह कोणाही राजकीय नेतृत्वास कल्पना दिली नव्हती असा खुलासा केला आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संयत भूमिका घेतली असून त्यांनी म्हटले आहे की,”आपण आणि नगराध्यक्ष पराग संधान हे एकच पक्षाचे असून त्यांना आपली सूचना आहे की,”त्यांनी आधी नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण धारकांना मुदत देऊन त्यांचं अतिक्रमण काढण्यास संधी द्यायला हवी होती.त्यामुळे त्यांचे नुकसान टळले असते.मात्र या आततायी धोरणामुळे शहरातील वातावरण दूषित आणि गढूळ होऊ शकत असल्याचे म्हटले आहे.

अतिक्रमण मोहीम सुरू झाली असताना नगरपरिषद कर्मचारी.

“आपण आणि नगराध्यक्ष पराग संधान हे एकच पक्षाचे असून त्यांना आपली सूचना आहे की,”त्यांनी आधी नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण धारकांना मुदत देऊन त्यांचं अतिक्रमण काढण्यास संधी द्यायला हवी होती.त्यामुळे त्यांचे नुकसान टळले असते.मात्र या आततायी धोरणामुळे शहरातील वातावरण दूषित आणि गढूळ होऊ शकते”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  दरम्यान याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे ते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”भाजप कोल्हे गटाने नगरपरिषद निवडणुकीत विस्थापिताना आपण पुन्हा एकदा गाळे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करू असे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्याचा आरोप करून या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी अतिक्रमणे काढले होती.मात्र दोन वर्षात पुन्हा पूर्ववत ते झाले आहे.याला दोषी कोण आहे असा सवाल केला आहे.तर याच पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी,”सत्ताधारी गटाने आम्हाला याची कोणतीही कल्पना दिली नाही की याबाबत बैठकही घेतलेली नाही.या मोहिमेची आधी कल्पना दिली असती तर व्यापाऱ्यांनी आपला माल बनवला नसता व त्याचे नुकसान टळले असते असे म्हटले आहे.झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल विचारला आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या मोहिमेची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती अशी बचावात्मक भूमिका घेतली आहे.अतिक्रमण धारकांचे दूरध्वनी आल्यावर आम्हाला ही मोहीम कळाली असल्याचे म्हटले आहे.आपण याबाबत मुख्याधिकारी जगताप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकारी आगामी 04 फेब्रुवारी रोजी येणार असल्याचे ही कारवाई केली असल्याचे सांगितले आहे.यापूर्वी अंबिका पान स्टॉल समोर जिल्हाधिकारी यांची गाडी वाहतुकीत अडकली होती त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.यात राजकीय नेतृत्वाचा संबंध नाही अशी भूमिका मांडली आहे.आमची ही कारवाई थांबवली असल्याचे सांगितले आहे.दरम्यान आमचा या विस्थापिताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे.त्यांचे विस्थापन झाले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे सांगितले शेवटी सांगितले आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

  याबाबत व्यावसायिक उमेश धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे की,”व्यापारी म्हणून शहरातील व्यावसायिक मोठी गुंतवणूक बांधकाम करतात शिवाय आम्ही नगरपालिकेला कर भरतो आणि आमच्या पुढे कोणी हातगाडी लावून व्यवसायाचे नुकसान करत असेल तर आणि आपला गल्ला भरत असतील तर ते चुकीचे आहे अशा  घटना नगररिषदेने टाळणे गरजचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close