जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग विभाग

पर्यटन क्षेत्र देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र -भोपे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून,व्यवसाय विस्तार,रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा तसेच त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करता यावे यासाठी याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अमृत संस्थेचे अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

अमृत संस्थेच्या कार्यक्रमाचे उदघाटन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी सागर भोपे.

“महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून,खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे.

     महाराष्ट्र शासनाच्या अमृत (महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) आणि एमसेड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो.या योजनेचा मुख्य उद्देश नवउद्योजकांना मार्गदर्शन करून स्वयंसिद्ध व रोजगार निर्मितीक्षम बनवणे हा आहे.यासाठी अर्जदार हा खुला प्रवर्ग व अमृतच्या लक्षित गटातील असावा.त्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.त्यासाठी साधारणपणे २१ ते ५० वर्षे वयोगटातील इच्छुक अर्ज करू शकतात.यात आयात-निर्यात,पर्यटन,अन्न प्रक्रिया तसेच इतर कौशल्य विकासाचे व्यावहारिक व सैद्धांतिक प्रशिक्षण दिले जाते.या कार्यक्रमास कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे उदघाटन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

   या अमृत संस्थेचे अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी माहिती देताना सांगितले की,” महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून,खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे.त्यामध्ये ब्राह्मण,कायस्थ,कोमटी,वैश्य,मारवाडी,पटेल,राजपूत,यलमार,अय्यंगार,राजपुरोहित,पाटीदार,नायर,नायडू,कम्मा,कानबी,सिंधी,बनिया,बंगाली,त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना,हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे.अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहे.

   सदर प्रसंगी प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी अमृत मित्र संदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत पेठ थेट बाजारपेठ,ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, व्याज परतावा योजना तसेच सी.एम.ई.जि.पी योजना सह इतर योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.या प्रशिक्षणात एकूण १४ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.हे प्रशिक्षण एकूण १० दिवसीय असणार आहे.यावेळी मकरंद कोऱ्हाळकर यांनी कोपरगाव परिसरातील समाज बांधव यांनी अमृत संस्थेच्या योजनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.या प्रशिक्षणाबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close