जाहिरात-9423439946
आंदोलन

…या कारखाना प्रशासना विरुद्ध सभा,सत्ताधारी गटात खळबळ !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

गणेश सहकारी कारखाण्याची मुदत संपलेली असताना मुदत संपलेल्या संचालक मंडळा कडून हा कारखाना डॉ.विखे कारखान्याच्या घशात घालण्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी ०५ वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना गेटच्या समोर शेतकरी व सभासदांची सभा अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे सत्ताधारी वर्गात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या निर्णया याविरोधात शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे डॉ.एकनाथ गोंदकर,गंगाधर चौधरी,शिवाजी लहारे,कारखान्याचे माजी अध्यक्ष एड.नारायण कार्ले,धनंजय जाधव,अशोक दंडवते,महेंद्र शेळके,भागवतराव चोळके आदींनी आवाहन केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे या लढाईत शेतकरी संघटनेसह,माजी मंत्री थोरात गट, माजी आ.कोल्हे गट आदी सामील झाले असल्याचे स्पष्ट दिसू लागले असून यातून आगामी निवडणुकीत हे गट एकत्र येण्याची शक्यता वाढली असल्याचे दिसू लागले आहे.

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूकीस आता रंग भरू लागला असून १९ जागांसाठी हि निवडणूक आगामी १७ जून रोजी संपन्न होत असून आलेल्या एकूण १०६ पैकी नामनर्देशन पत्रापैकी १३ अवैध झाले असताना दाखल असलेले अर्ज इच्छुकांना २३ मे ते ०६ जून या दरम्यान मागे घेण्याची अंतिम मुदत असताना या निवडणुकीला एक गंभीर वळण प्राप्त झाले असून यात दि.३१ मे रोजी रोजी गणेश कारखाना परत एकदा डॉ.विठ्ठलराव विखे (प्रवरा)सहकारी कारखान्यास चालवण्यासाठी गणेशच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळा कडून धक्कादायक पद्धतीने करार केला आहे.त्यामुळे गणेशच्या सभासदांत खळबळ उडाली आहे.या निर्णयाने आगामी काळातील लोकशाहीच्या चाकोरीतील हुकूमशाही आता स्पष्ट दिसू लागली आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेने या विरुद्ध ‘बंड’ पुकारले असून त्यासाठी दि.०३ जून रोजी सायंकाळी ०५ वाजता कारखाना प्रवेशद्वाराच्या समोर शेतकरी आणि सभासद आदींची,’जाहीर सभा’ आयोजित केली असल्याचे जाहीर केले आहे.

सदर सभेत शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णया विरोधात,’शेतकरी मेळावा’ घेऊन या निर्णयाचे मंथन करण्यात येणार आहे.या शिवाय,’श्री गणेश बचाव,शेतकरी बचाव,सभासद बचाव व ‘कामगार बचाव’ आदी घोषणा करण्यासह आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यासाठी श्री गणेश कारखाना स्वबळावर सक्षमपणे चालू राहण्यासाठी सर्व शेतकरी सभासद व कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आवाहन केले आहे.

(सदर बातमीत काही काळासाठी अनावधानाने सभे ऐवजी आंदोलन झाले होते,त्याबद्दल क्षमस्व)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close