जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या शहरात अनधिकृत फ्लेक्सला अखेर बंदी,आंदोलन स्थगित !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव नगरपरिषद अवैध फ्लेक्स बाजीला उधाण आले असून याबाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासनाला काडीचा फरक पडलेला नाही.अखेर निवेदन देऊन आज सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आपल्या आंदोलनाचे हत्यार उपसले होते.याची गंभीर दखल घेऊन नगराध्यक्ष पराग संधान यांनी तातडीने आंदोनस्थळी धाव घेऊन आम्ही गत महिन्यातील 22 एप्रिल रोजी हा विषय पटलावर घेऊन मंजूर केला आहे व आगामी आठ दिवसात शहरातील फ्लेक्सच्या जागा निश्चिती करून बेकायदा फ्लेक्स बंद करू असे आश्वासन दिल्याने काळे यांनी आपले आंदोलन अखेर मागे घेतले आहे.

नगरपरिषदेने गत महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत विषय क्रं.12 घेतला असून त्यात शहरातील बेकायदा फ्लेक्स हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगताना नागाध्यक्ष पराग संधान दिसत आहे.

“आपण आजवर नगरपरिषद प्रशासन,पोलीस प्रशासन,इत्यादी ठिकाणी “वारंवार” पत्रव्यवहार केल्याची आठवण करून दिली,अनेक वेळेस सत्याग्रह केलेत.परंतु सातवा वेतन घेणारे घेणारे भ्रष्ट अधिकारी कोणत्याही फलकावर कारवाई करताना दिसले नाहीत.त्यातून सरळ सरळ उच्च न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप केला आहे” -संजय काळे,सामाजिक कार्यकर्ते, कोपरगाव.

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्सबाजी आणि होर्डिंग्जमुळे विद्रुपीकरण होत असल्याचे समोर आले होते.राजकीय नेत्यांचे वाढदिवस,नियुक्त्या आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात विनापरवाना फलक लावले जात आहेत.या फ्लेक्सबाजीमुळे केवळ शहराचे सौंदर्य खराब होत नाही, तर अनेक ठिकाणी वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन अपघातांचा धोकाही वाढत आहे.यावर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने ७१ हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले.व अनधिकृत जाहिराती आणि फ्लेक्स लावणाऱ्यांकडून प्रशासनाने आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.त्यानंतर कोपरगावात संजय काळे यांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करून अनधिकृत फ्लेक्स बंद करावे अशी मागणी वारंवार केली आहे.प्रशासनाने कानाडोळा केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या एक जनहित याचिकेचा (पी.आय.एल.155/2011ता.31 जानेवारी 2017) दाखला देत कारवाईची मागणी केली होती.मात्र तरीही प्रशासनाला घाम फुटला नव्हता अखेर त्यांनी आज सकाळी 10.30 वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे दालनासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली तेव्हा मुख्याधिकारी कार्यालयात कोणीही प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते.

     दरम्यान 11.15 वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान हे आले आणि त्यांनी थेट आंदोनस्थळी जाऊन आंदोलनकर्ते संजय काळे यांनी भेट घेऊन त्यांना नगरपरिषदेने गत महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत विषय क्रं.12 घेतला असून त्यात शहरातील बेकायदा फ्लेक्स हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.मात्र त्यानंतरही संजय काळे आपल्या आंदोलनावर ठाम राहिले असल्याचे दिसून आले .त्यांनी,”आपण आजवर नगरपरिषद प्रशासन,पोलीस प्रशासन,इत्यादी ठिकाणी “वारंवार” पत्रव्यवहार केल्याची आठवण करून दिली,अनेक वेळेस सत्याग्रह केलेत.परंतु सातवा वेतन घेणारे घेणारे भ्रष्ट अधिकारी कोणत्याही फलकावर कारवाई करताना दिसले नाहीत.त्यातून सरळ सरळ उच्च न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप केला आहे.

आंदोलनादरम्यान प्रशासकीय कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.

“कोपरगाव शहरात आगामी काळात फ्लेक्स वर जागा निश्चितीचे ठिकाण,फ्लेक्सची संख्या,फ्लेक्स लावण्याची मुदत,त्याचा परवाना आदी परवानाधारक फ्लेक्सवर लावले पाहिजे अशा मागण्या केल्या आहे.गुन्हेगार राजरोस नेत्यांना फ्लेक्सद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.यातून काय सामाजिक संदेश जात आहे ? आगामी तरुण पिढिला काय शिकवण देत आहे ? असे सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केले आहे.

   शहरातील प्रमुख रस्ते,प्रमुख चौक,प्रमुख शासकीय मालमत्ता रस्ता दुभाजक,इलेक्ट्रीक पोल,सुशोभीतन वास्तू,बगीचे,संरक्षण भिंती,शाळा,महाविद्यालये,मंदीराची आवारे,इत्यादी चालकांचे व पदाचारी यांचे चित्त विचलित करणारे ठिकाणे,रहदारीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी वाढदिवसाच्या,शुभेच्छांचे फलक, 5(अ) ते 5(क) चे नियमाचे उल्लंघन करून,शासनाचा जाहिरात कर बुडवून,रोज शेकडो फलक लावून शहराच्या विद्रुपीकरणात नेत्यांच्या आशिर्वादाने,नित्य उच्च न्यायालयाचा अवमान चालू आहे़ ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले आहे.व आगामी काळात फ्लेक्स वर जागा निश्चितीचे ठिकाण,फ्लेक्सची संख्या,फ्लेक्स लावण्याची मुदत,त्याचा परवाना आदी परवानाधारक फ्लेक्सवर लावले पाहिजे अशा मागण्या केल्या आहे.गुन्हेगार राजरोस नेत्यांना फ्लेक्सद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.यातून काय सामाजिक संदेश जात आहे ? आगामी तरुण पिढिला काय शिकवण देत आहे ? असे  सवाल केले आहे.शहरातील बेकायदा फ्लेक्स तातडीने हटवा अशी मागणी केली.त्याला नगराध्यक्ष संधान यांनी समंती दिली आहे व आगामी आठ दिवसात धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी सुरू करू असे आश्वासन दिले आहे.त्यानंतर कार्यकर्ते संजय काळे यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close