जाहिरात-9423439946
आंदोलन

निळवंडे कालव्यांचे बंद काम त्वरित सुरु करा अन्यथा आंदोलन-कालवा समिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे आदेश असतानाही अकोले तालुक्यात निळवंडे कालव्यांचे काम बंद असून जलसंपदा विभाग व महसूल विभागाने केवळ बघ्याची भुमीका घेतली असून हि बाब निषेधार्ह असून सदर काम त्वरित सुरु करा अन्यथा संगमनेर प्रांत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ नेते नामदेवराव दिघे यांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांना समक्ष भेटून आज दुपारी ३ वाजता दिले आहे.

“अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काही विधायक व सनदशीर अडचणी असतील तर शेतकरी म्हणून त्या सन्मानपूर्वक सोडून प्रशासनाने त्या मार्गी लावून मार्ग काढावा त्यासाठी निळवंडे कालवा समिती त्यांच्याबरोबर आहे.मात्र बेकायदा मागण्या करून निळवंडे कालव्यांचे काम पडद्याआडून कोणी वेठीस धरीत असतील त्यावर कठोर कारवाई करून मार्ग काढण्याचे काम अ.नगर जिल्हाधिकारी व महसूल व पोलीस विभागाचे आहे.व सदर काम तातडीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पूर्ण करावे”-गंगाधर रहाणे,माजी उपाध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त असलेल्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या ५ हजार १७७ लाख ३८ हजार कोटींच्या पंचम सुप्रमास राज्य सरकारने महाआघाडी व नूतन सरकारच्या काळात निळवंडे कालवा कृती समितीच्या पाठपुराव्यातून नुकतीच मंजुरी दिली असून त्याबाबत उत्तर नगर जिल्ह्यात त्याबाबत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.मात्र त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच अकोले तालुक्यात काही नागरिकांनी सदरचे काम पंधरा दिवसापासून बंद पाडले असून त्यावर प्रस्थापित नेत्यांनी मौन पाळल्याबद्दल निळवंडे कालवा कृती समितीने आश्चर्य व्यक्त केले आहे.शिवाय जलसंपदा व महसूल विभागाचे जिल्हाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही हे मोठी खेदाची बाब आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा उजव्या कालव्यासाठी ५२ वर्ष उलटली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून ५ हजार १७७ लाख ३८ हजार कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांच्या खंडपीठाने दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जयराम जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (जनहित याचिका क्रं.१३३/२०१६)स्पष्टपणे नुकतेच बजावले आहे.त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता या विभागाला डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा हा जून अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले असताना त्यावर प्रस्थापित काही नागरिकांना पुढे करून व त्यांच्या आडून काही नेते अजूनही या कामात अडथळा आणण्याची एकही संधी सोडत नसल्याचे वारंवार दिसत आहे.

दरम्यान अकोले तालुक्यात किरकोळ कारणातून काम बंद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.संदर्भीय शेतकऱ्यांच्या काही विधायक व कायदेशीर अडचणी असतील तर शेतकरी म्हणून त्या सन्मानपूर्वक सोडून प्रशासनाने त्या मार्गी लावून त्यातून मार्ग काढावा त्यासाठी निळवंडे कालवा समिती शेतकऱ्यांबरोबर आहे.मात्र बेकायदा मागण्या करून कोणी निळवंडे कालव्यांचे काम पडद्याआडून कोणी वेठीस धरीत असतील त्यावर सनदशीर मार्ग काढण्याचे काम अ.नगर जिल्हाधिकारी व महसूल व पोलीस विभागाचे आहे.व सदर काम तातडीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पूर्ण करावे.या पुर्वीचे अनुभव अत्यंत वाईट आहेत.त्यामुळे या प्रकल्पाला ५२ वर्ष पूर्ण होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.त्यासाठी रस्त्यावर व चौकाचौकात बॅनरबाजी करणारेच आडमार्गाने काम बंद करून शेतकऱ्यांच्या घशातून पाणी काढून त्या पाण्याचा वापर आपल्या आर्थिक फायद्यासाठी व मद्य धोरणासाठी करत असल्याचे समितीने वारंवार पुराव्यासह उघड केले आहे.सदर काम आठ दिवसात पूर्ववत सुरु न झाल्यास निळवंडे कालवा कृती समिती कोणत्याही क्षणी कोणतेही आंदोलन करील व त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागावर राहील असा इशारा शेवटी दिघे यांनी दिला असून याकडे कालवा कृती समिती उच्च न्यायालयाचे लक्ष वेधून घेणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

सदर निवेनावर समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अशोक गांडोळे,उत्तमराव जोंधळे,सोमनाथ दरंदले,दशराथ बोरकर,विठ्ठलराव देशमुख,संदेश देशमुख,कांताराम कडलग आदींच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी अ.नगर,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक,ऊर्ध्व प्रवरा-२ (निळवंडे) प्रकल्पाचे धरण विभागाचे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने,कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे,संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव आदींना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close