आंदोलन
आमच्या जमिनी परत करा;अन्यथा जेलभरो आंदोलन !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरानजीक असलेल्या साईबाबा चौक परिसरात असलेली महार वतनाची ५०.३३ एकर जमीन प्रस्थापितांनी परस्पर वाटून घेतली असून ०१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असून या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी नगरपरिषद आणि महसूल विभागाच्या विरुद्ध संबंधित शेतकऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केले असून या आंदोलनाची दखल न घेतल्यास आपण आगामी काळात ‘जेलभरो आंदोलन’करू असा इशारा शेतकरी प्रकाश दुशिंग यांनी दिला आहे.

“ज्यांनी आमच्या जमिनीवर अनधिकाराने जमीन ताब्यात घेतली आहे.त्यांच्यावर शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा.अजून तरी आम्ही कायदा सुव्यवस्था पाळत असून आगामी काळात आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आम्ही ‘जेलभरो आंदोलन करू पण आमच्या जमिनी मुक्त करू”-प्रकाश दुशिंग,महार वतनदार शेतकरी.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,” कोपरगाव ग्रामीण हद्दीत गट क्रमांक अनुक्रमे ५,६,७,८,९ हे पूर्वीचे ०५ गट क्रमांकाच्या महार वतनाच्या जमिनी आहेत.त्याच पुढे सिटी सर्व्हे होऊन त्याचा क्रमांक हा १९३५ झाला आहे.या ५०.३३ एकर क्षेत्राची आजची किंमत जवळपास ०१ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.ती जमीन त्यांचे वडिलोपार्जित महार वतनाचे क्षेत्र असल्याचा त्यांचा दावा आहे.याशिवाय हे तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्ध झाले आहेच;पण सेनेचे बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेत हे सिद्ध झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची अवैध नोंद हटवली आहे.वर्तमानात आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत केलेल्या पुराव्यात मंडलाधिकारी यांनीही ही जमीन महार वतनाची म्हणजेच आंदोलनकर्त्या वाली वारसांची असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी कोपरगाव तालुक्यातील ज्या ईशान्यगड आणि पश्चिम गडाच्या नेत्यांनी आमच्या जमिनी फुकटात आपल्या घशात घातल्या आहेत त्याचा निषेध व्यक्त करून त्यांचेवर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रकाश कोपरे व बाबासाहेब कोपरे यांनी आपल्या भाषणात केली आहे.
आमच्या पारंपरिक महार वतनाच्या जमिनी परत कराव्या अशी महत्वपूर्ण मागणी करून या आंदोलनकर्त्यांनी प्रस्थापितांना घाम फोडला असल्याचे बोलले जात आहे.प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद यांनी ही जमीन अनधिकाराने बळकावली असल्याचा त्यांचा दावा आहे.ती जमीन आम्हाला परत मिळावी व ज्यांनी ती अवैध बळकावली त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन गेले दहा दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.मात्र त्याची न शिर्डी येथील पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली ना प्रांताधिकाऱ्यांनी दखल घेतली त्यामुळे हे महार वतनदार शेतकरी संतप्त झाले आहे.त्यांनी त्यामुळे या दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा निर्णय घेतला होता आणि आज सकाळी 11 वाजता साईबाबा कॉर्नर या ठिकाणी नगर-मनमाड हा राष्ट्रीय महामार्गावर,’रास्ता रोको ‘ आंदोलन केले आहे.

त्यावेळी त्यांनी अर्धा तास आंदोलन केले असून त्या ठिकाणी त्यांनी ज्यांनी आमच्या जमिनीवर अनाधिकाराने जमीन ताब्यात घेतली आहे.त्यांच्यावर शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.अजून तरी आम्ही कायदा सुव्यवस्था पाळत असून आगामी काळात आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आम्ही ‘जेलभरो आंदोलन ‘करू असा इशारा या आंदोलनाचे नेते प्रकाश सुकदेव दुशिंग,बाबासाहेब भास्कर कोपरे आदींनी केले आहे.यावेळी महिलांनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.मात्र वाहतूक कोंडी झाल्याने अर्ध्या तासाने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

यावेळी संतोष बाबुराव कोपरे,देविदास त्र्यंबक गायकवाड,अशोक जगन कोपरे,संदीप दुशिंग,संतोष कोपरे,आनंद कोपरे,हेमंत कोपरे,देविदास गायकवाड,संतोष गायकवाड,किशोर दुशिंग,सुनील कोपरे,पोपट कोपरे,सुशील कोपरे,छबू दुशिंग,तुकाराम कोपरे,प्रमोद कोपरे,अर्चना दुशिंग,अनिता कोपरे,लक्ष्मीबाई कोपरे,साक्षी कोपरे,मंगल कोपरे,आदीसह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

दरम्यान यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मशाळा सुंदर्डे,यांचेसह पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,संदीप सोन्ने संजय पवार आदीसह पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता.मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी अर्ध्या तासात पुन्हा नगर मनमाड मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान यावेळी कोपरगाव तालुक्यातील ज्या ईशान्यगड आणि पश्चिम गडाच्या नेत्यांनी आमच्या जमिनी फुकटात आपल्या घशात घातल्या आहेत त्याचा निषेध व्यक्त करून त्यांचेवर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रकाश कोपरे व बाबासाहेब कोपरे यांनी आपल्या भाषणात केली आहे.



