जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

उभ्या पिकात ट्रॅक्टर घातला,हाणामारी,अस्ट्रॉसिटीची धमकी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी 11 बाजेच्या सुमारास आरोपींनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घालून पिकांची नासाडी केल्या प्रकरणी दोन गटात हाणामारी झाली असून आरोपींनी अस्ट्रॉसिटीची धमकी दिली असल्याचे बाब उघड झाली आहे.या प्रकरणी मुक्ताबाई उत्तम गंगावणे (वय- 55) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपी दशरथ विश्वनाथ पवार,दगडी दशरथ पवार,रेणुका अशोक पवार,लहानबाई सूर्यभान माळी यांचेसह 11 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे हिंगणीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हिंगणी येथील आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादी आणि तिचे पती,मुलगी आदींना संगनमत करून गैरकायदयाची मंडळी जमवुन शेतातील पिकाची नुकसान करुन त्यावर फिर्यादी यांनी,”आमचे शेत नांगरु नका,पिकाची नुकसान करु नका”असे म्हणाले असता आरोपी दशरथ पवार आणि त्यांचे अन्य सहकारी आदीनी फिर्यादी तसेच फिर्यादीचे पती तसेच मुलगी यांना वाईट वाईट शिवीगाळ करुन,लाथाबुक्याने मारहाण केली तसेच,”तुम्हा सर्वांना ट्रॅक्टरच्या खालीच मारुन टाकतो” असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच “तुमच्यावर सर्वांवर अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करतो” सज्जड दम भरला आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात कोपरगाव तालुक्यात बऱ्यापैकी पर्जन्य झाला असून पेरण्या झाल्या असून काही सुरू आहे.त्यामुळे शेतात शेतकऱ्यांनी आपला राबता वाढवला आहे.या शिवाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे वाढवली असून त्यासाठी चारा पिके घेतली जात आहे.त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना शेतात रोज चारा आणण्यासाठी जावे लागते आहे.परिणामी ग्रामीण भागात वादविवाद वाढत असताना दिसून येत आहे.अशीच घटना आज सकाळी 11 वाजता घडली आहे.यापूर्वी 11 जुलै रोजी किरकोळ वादविवाद झाला होता त्यातून त्याची पायाभरणी झाली होती.आज त्याचे थेट हाणामारीत रुपांतर झाले आहे.

   यातील फिर्यादी महिला मुक्ताबाई गंगावणे या व त्यांचे पती उत्तम रंगनाथ गंगावणे मुलगी संपदा दीपक इंगळे आदी आपल्या हिंगणी ता कोपरगाव शिवारातील शेत गट नं.1/2 मध्ये गवत घेत असतांना आरोपी दशरथ विश्वनाथ पवार,दगडी दशरथ पवार,रेणुका अशोक पवार,रा.धानोरे तालुका येवला,लहानबाई सुर्यभान माळी,रावसाहेब सुर्यभान माळी,चिलाजी एकनाथ पवार,भाऊराव भोर (पुर्ण नाव माहित नाही),शुभम राजेंद्र चंदनशीव,मच्छींद्र लक्ष्मण चंदनशीव,सुनिल ऊर्फ अनिल मारुती गोधडे व इतर 11 ते 12 सर्व रा.हिंगणी आदींनी संगनमत गैरकायदयाची मंडळी जमवुन शेतातील पिकाची नुकसान करुन त्यावर फिर्यादी यांनी,” आमचे शेत नांगरु नका,पिकाची नुकसान करु नका”  असे म्हणाले असता आरोपी दशरथ पवार आणि त्यांचे अन्य सहकारी आदीनी फिर्यादी तसेच फिर्यादीचे पती तसेच मुलगी यांना वाईट वाईट शिवीगाळ करुन,लाथाबुक्याने मारहाण केली तसेच,” तुम्हा सर्वांना ट्रॅक्टरच्या खालीच मारुन टाकतो”  असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच “तुमच्यावर सर्वांवर अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करतो”  असे म्हणुन दमदाटी केली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रं.-165/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118 (1),115(2),352(3)(5) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल    हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close