जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीचे लग्न,पाच जणांवर गुन्हा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   देशात बाल विवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतानाही कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत असा विवाह नुकताच घडून आणल्याने या विरोधात सजग ग्रामविकास अधिकारी संदीप अशोक थोरात यांनी नितीन जयराम रामकर,जयराम पुंजाराम रामकर,सुमनबाई जयराम रामकर,रघुवीर चिंधाजी सोनवणे,सुवर्णा रघुवीर सोनवणे या पाच जणांवर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

वर्तमानात मुलींचे प्रमाण 01 हजार मुलांच्या प्रमाणात  850 इतके निचांकी झाल्याने अनेक विवाह इच्छुक तरुण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.मात्र चाळीशी उलटूनही विवाह होण्याचे नाव घेत नाही हे वास्तव समोर आले आहे.त्यामुळे आता अविवाहित तरुण आणि त्यांचे पालक थांबण्यास तयार नाही जे मिळेल त्यात समाधान मानताना दिसून येत आहे.आता आदिवासी आणि अन्य जातीच्या मुलींना मागणी वाढत चालली आहे.त्यातून अशा घटना वाढत चालल्या असल्याने असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.करंजी येथील प्रकार असाच असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.मात्र यात जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून येत आहे.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”भारतात ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६’  नुसार मुलीचे कायदेशीर लग्नाचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.१८ वर्षांखालील मुलीचे लग्न केल्यास तो बेकायदेशीर आणि गुन्हा मानला जातो.१८ वर्षांखालील मुलीशी लग्न करणाऱ्या किंवा लग्नास परवानगी देणाऱ्या तसेच आयोजित करणाऱ्या प्रौढ व्यक्तीला २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे.अल्पवयीन मुलीशी लग्न करणे आणि शारीरिक संबंध ठेवणे हा ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गंभीर गुन्हा ठरत असताना कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत अशी घटना दिनाक 09 जुलै 2026 रोजी दुपारी 01 वाजता घडून आली असल्याचे उघड झाले आहे.ही बाब येथील ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलून याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची खबर दिली आहे.व या प्रकरणी आरोपी वर गुन्हा दाखल केला आहे.

   याबाबत ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आरोपी नितीन जयराम रामकर याने आपली मुलगी गायत्री रघुवीर हिचा करंजी शिवारात आपली मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही तिचे सोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे तिचे सोबत लग्न केले आहे.तर आरोपी जयराम रामकर,जयराम पुंजाराम रामकर,सुमनबाई जयराम रामकर तिघे रा.करंजी तालुका कोपरगाव तर रघुवीर चिंधाजी सोनवणे,सुवर्णा रघुवीर सोनवणे रा.गांजावाडी,मुर्शतपूर आदींनी सदरचे लग्न हे मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही तिचे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लादून तिला प्रोत्साहित केलं असल्याचा आरोप केला आहे.व या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींनी घटनास्थळी घाव घेऊन भेट दिली आहे.

   कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.294/2026 बाल विवाह संरक्षण अधिनियम 2006 चे कलम 9,10,11 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निजाम शेख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close