जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या रस्त्याची दुरावस्था,सेनेचा आंदोलनाचा इशारा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस ब्राह्मणगाव,बदापूर या परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी महत्वाचा असलेल्या ब्राह्मणगाव-बदापूर रस्त्याची पार वाट लागली असून वर्तमानात या मार्गाने जाणे हे मोठे आव्हान ठरत असून हा रस्ता तातडीने मजबुतीकरण करणे गरजेचे आहे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा येथील शिवसेना (उ.बा.ठा.गट) उपतालुका प्रमुख सचिन आसने आणि ग्रामस्थानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.

ब्राह्मणगाव-बदापूर रस्त्याची पार वाट लागली असल्याचे दिसून येत आहे.

 

ब्राह्मणगाव-बदापूर रस्त्याची पार वाट लागली असून या दुरावस्थेचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना भोगावे लागत असून त्यांच्या शेतीमालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.खराब रस्त्यांमुळे शेतमाल वेळेवर आणि सुरक्षितपणे बाजारपेठेत पोहोचत नाही.यामुळे मालाची नासाडी होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.गरोदर महिला किंवा गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही,ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे”- सचिन आसने,उपतालुका प्रमुख,शिवसेना,उबाठा.

    कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची दुरावस्था नागरिकांना नवी नाही.आता त्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची भर पडून या रस्त्याची दुरावस्था हा आर्थिक आणि सामाजिक विकासाला खीळ घालणारा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.खड्डे,उखडलेले डांबर आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे दैनंदिन जनजीवन,शेती व्यवसाय आणि आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होत असून,या समस्येकडे प्रशासनाने कोपरगावच्या नेत्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.या दुरावस्थेचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना भोगावे लागत असून त्यांच्या शेतीमालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.खराब रस्त्यांमुळे शेतमाल वेळेवर आणि सुरक्षितपणे बाजारपेठेत पोहोचत नाही.यामुळे मालाची नासाडी होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.गरोदर महिला किंवा गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही,ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो.रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे आणि धूळ यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.अनेकदा दुचाकी घसरून गंभीर दुखापती होतात.त्यांची किंमत स्थानिकांना चुकवावी लागत आहे.खराब रस्त्यांमुळे शाळकरी मुलांची बस किंवा वाहने वेळेवर धावत नाहीत,परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि नागरिकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे.कोपरगाव तालुक्याला आता दोन लोकप्रतिनिधी असून त्यांना या समस्येकडे पहायला वेळ मिळेल का ? असा सवाल सचिन आसने यांच्यासह ग्रामस्थानी केला आहे

दरम्यान याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा शेवटी सचिन आसने यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.त्यामुळे आता या जिल्हा मार्गासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close