जाहिरात-9423439946
अपघात

पाथरे नजीक बस-ट्रकचा अपघात,१० ठार,१७ जखमी झाल्याची भीती!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
वावी-(प्रतिनिधी)

सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे ग्रामपंचायत हद्दीत ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे.खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.या अपघातात सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत  आहे.त्यात ०२ पुरुष,०७ महिला,०१ मुलगा आदींचा समावेश आहे.या आराम बसमधील बहुसंख्य असलेले १७ प्रवासी गंभीर जखमी आहेत.

दरम्यान शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी उल्लासनगर मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी लक्झरी बस क्र एम एच ०४ एफ के २७५१ व नाशिककडे जाणारी ट्रक एम एच ४८ टी १२९५ हिचा समोरासमोर अपघात होऊन १० ठार झाले आहेत त्यात ७ महिला,१ लहान मुलगी,१ मुलगा यांचा समावेश असून १७ गंभीर जखमींवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत.

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक एम एच ०४ एस.के.२७५१) व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा माल ट्रक (क्रमांक एम एच ४८ टी.१२९५) यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्या दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.त्यामुळे ते साईभक्त असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या.प्रवासी यादीनुसार बसमध्ये काही प्रवासी नव्हते,बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते.त्यामुळे मृतांची नावे व बसमधील प्रवाशांची नावे कळण्यास उशीर लागेल. गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीची बस होती.३५ ते ४० प्रवासी उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यात मृतांचा देखील समावेश आहे.जखमींना वावी पोलीस मदत करत आहेत.या अपघाताची मोठी भीषणता समोर येत आहे.

   दरम्यान मयत दहा नागरिकांत  नरेश उबाळे (वय-३८)रा.मोरवलीगाव,अंबरनाथ,वैशाली नरेश उबाळे (वय-३२),रोशनी राजेश वाडेकर,(वय-३६),प्रमिला प्रकाश गोंधळी,(वय-४५)रा.हातीब,ता.संगमनेर,दीक्षा संतोष गोंधळी,(वय-१७) रा.एकविरा प्लाझा २०९,दुसरा मजला बी.विंग,लक्ष्मी नगर चिंचपाडा,कल्याण पुर्व,बालाजी कृष्ण महंती,(वय-२८) रा.मोरवली,अंबरनाथ,अशुमन,बाबू महंती,(वय-७)रा.मोरवली,अंबरनाथ,श्रावणी सुहास बावस्कर,श्रद्धा बावस्कर,चांदणी निर्मल गच्छे आदी दहा जणांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान मयतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close