कोपरगाव शहर वृत्त
शहरातील घरपट्टी,पाणीपट्टी वसुली थांबवा-…या पक्षाने केली मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगावसह राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा तगादा पालिकेने थांबणे गरजेचे असल्याची मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या विरोधी गटाच्या पक्षनेत्या आणि नगरसेवक आदींनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांचेकडे एका निवेदनाद्वारे आज केली आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेकडून घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना वारंवार नोटिसा,तगादा किंवा वसुलीची कार्यवाही करण्यात आल्यास सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.विशेषतः दैनंदिन जीवनावश्यक खर्च आणि कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविणे हे नागरिकांसमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.कोपरगाव नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे.त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने संवेदनशील व लोकाभिमुख भूमिका घेणे आवश्यक आहे”- वीरेन बोरावके,माजी गटनेते,कोपरगाव नगरपरिषद.
महाराष्ट्रातील राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून,पावसाच्या खंडामुळे ३५८ पैकी २६५ तालुके (सुमारे ७५% भाग) प्रभावित झाले आहेत.परिणामी राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती राज्य सरकारने घोषित करण्यात आली आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून या समितीला थेट निर्णय घेण्याचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत.त्यात सरकारने दुष्काळग्रस्त भागातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सुरुवातीपासूनच न घेण्याचे आदेश दिले असल्याचे पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक यांनी आज ही मागणी केली आहे.त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान त्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.कोपरगाव तालुक्याचाही दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये समावेश झालेला असून ट्रिगर-१ लागू झालेला आहे.या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीवर झाला असून शेतक-यांच्या उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे.शेती उत्पादनात झालेली घट,उत्पन्नामध्ये झालेली कमतरता आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर आलेली मरगळ याचा थेट परिणाम कोपरगाव शहरातील बाजारपेठ, छोटे-मोठे व्यावसायिक,व्यापारी,कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होत आहे.सध्याच्या परिस्थितीत अनेक कुटुंबांना घरखर्च,शैक्षणिक खर्च,आरोग्यविषयक खर्च तसेच इतर अत्यावश्यक गरजा भागविताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेकडून घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना वारंवार नोटिसा,तगादा किंवा वसुलीची कार्यवाही करण्यात आल्यास सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.विशेषतः दैनंदिन जीवनावश्यक खर्च आणि कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविणे हे नागरिकांसमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.कोपरगाव नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे.त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने संवेदनशील व लोकाभिमुख भूमिका घेणे आवश्यक आहे.तरी कृपया कोपरगांव नगरपरिषदेने कोपरगाव तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती संपुष्टात येईपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा पठाणी तगादा तूर्तास थांबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
सदर निवेदन देताना राष्ट्रवादीचे माजी गटनेते विरेन बोरावके,राजेंद्र आभाळे,नवाज कुरेशी,फकीर कुरेशी,अमित आगळावे,सुनील फंड,सुनील गलांडे,सागर फडे,अमोल देवकर,हारून शेख,सिद्धार्थ शेळके,नितीश बोरुडे,महेश मते,जनार्दन शिंदे,संतोष दळवी,शिवाजी कुऱ्हाडे,चंद्रकांत धोत्रे,सुनील वैरागळ,कार्तिक सरदार,शुभम लासुरे, शफीक शेख,ओम गायकवाड,सोमेश शिंदे,अमजद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.आता कोपरगाव नगरपरिषद पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकाने लक्ष लागून राहिले आहे.



