सहकार
…या बँकेने केले किमान व्याज आकारणी धोरण जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांसाठी खेळत्या भांडवलापोटी कॅश क्रेडिट हायपोथीकेशन व सिक्युअर्ड कॅश क्रेडिट मर्यादा दिलेल्या असून यातील बरेचसे ग्राहक हे या मर्यादा नियमितपणे वापरीत नाहीत.पर्यायाने बँकेच्या लाभप्रदतेवर याचा परिणाम होत आहे.परिणामी त्यामुळे दि.१ जानेवारी २०२७ पासून बँक व्यवस्थापन किमान व्याज आकारणी धोरण आणणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष रविंद्र ठोळे यांनी नुकतीच एक कार्यक्रमात केली आहे.

“यावर्षी कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या सभासदांना यावर्षी १२% प्रमाणे लाभांश देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.बँक देत असलेल्या सुविधेचा सभासदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या बँकेच्या प्रगतीस हातभार लावून संस्थेचे नाव उज्ज्वल करावे”- रविंद्र ठोळे,अध्यक्ष,कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक.
कोपरगाव शहरात सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरून अध्यक्ष रविंद्र ठोळे हे बोलत होते.

सदर प्रसंगी बँकेच्या उपाध्यक्षा त्रिशला गंगवाल,संचालक कैलासचंद ठोळे,रविंद्र लोहाडे,धरमकुमार बागरेचा,कल्पेश शहा,अतुल काले,राजेंद्र शिंगी,सत्येन मुंदडा,सुनिल बंब,दिपक पांडे, अनिल कंगले,हेमंत बोरावके,वसंत आव्हाड,भाऊसाहेब लोहकरे,संचालिका प्रतिभा शिलेदार,तज्ञ संचालक संजय भोकरे,व्यवस्थापन मंडळ सदस्य संदीप रोहमारे,बँकेचे कायदेशीर सल्लागार ॲड.संजीव कुलकर्णी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे.बँकेने मोबाईल बँकिंग,गुगल पेफोन पे,क्यू.आर.कोड,ए.टी.एम.या सारख्या सुविधा चालू केलेल्या आहेत.तंत्रज्ञानामध्ये आता फक्त नेट बँकिंगच्या सुविधेची कमी आहे.ती देखील आवश्यक असलेल्या रु.५० कोटी नेटवर्थचा टप्पा लवकर पूर्ण करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पूर्वमान्यतेने नजीकच्या काळात करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.तसेच यावर्षी सभासदांना १२% प्रमाणे लाभांश देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.बँक देत असलेल्या सुविधेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या बँकेच्या प्रगतीस हातभार लावून संस्थेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन शेवटी केले आहे.
दरम्यान यावेळी अहवाल वाचन बँकेचे व्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे यांनी केले आहे तर बँकेचे ज्येष्ठ संचालक अतुल काले यांनी तर सूत्रसंचालन शाखाधिकारी जितेंद्र छाजेड यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक कल्पेश शहा यांनी मानले आहे.



