जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

…यांच्या “प्रसाद ज्ञानेश्वरी” ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर (वार्ताहर)


   मुळचे कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व वर्तमानात सोलापूर येथे स्थायीक झालेले लेखक नारायणराव काका कुलकर्णी यांनी लिहिलेल्या “प्रसाद ज्ञानेश्वरी” या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या मठामध्ये उत्साहात संपन्न झाले.धार्मिक,सामाजिक,साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या मठामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

“गीता हा ग्रंथ समजायला अतिशय अवघड आहे.म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी तो प्राकृत भाषेत करून ज्ञानेश्वरीच्या रुपात सर्वसामान्य लोकांना तो समजेल अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये आपल्या समोर मांडला.सातशे वर्षांपूर्वीच्या शब्दांचा अर्थबोध होत नाही.त्या काळातील शब्द व आजच्या काळातले शब्द यामध्ये थोडं अंतर आहे.ओवी छंदामध्ये ज्ञानेश्वरी वाचायची,त्याचा अन्वय लावायचा,अन्वय लावून मग अर्थ समजून घ्यावा लागतो”-ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर.

    संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून लेखक नारायणराव काका कलकर्णी सर्वपरिचीत आहेत.ते मुळचे कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी असून त्यांचे बालपण व शिक्षण संवत्सर येथे झालेले आहे.ते सोलापूर परिसरात स्थायीक आहेत.या कालावधीत त्यांनी संत साहित्यावर प्रगाढ अभ्यास केल्यानंतर “प्रसाद ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ त्यांनी लिहिला.त्यांच्या प्रथम आवृत्तीला सर्वत्रच चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.नाशिक येथील वरद प्रकाशनतर्फे प्रकाशनच्या संचालिका नूतन व राजेश कुलकर्णी यांनी दि. ९ सप्टेंबर रोजी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते.त्यावेळी परम पूजनीय ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या शुभहस्ते या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.

    सदर कार्यक्रमासाठी डॉ.माधवी रायते,अतुल जोशी,अजित कुलकर्णी,बाळासाहेब कुलकर्णी,ॲड.यतीश वाडेकर,आशिष जोशी,श्रीमती सुशीला कुलकर्णी,शामराव व निरंजन कुलकर्णी,नारायण घोळे,सुरेंद्र वाकनीस,आरती भोकरे,डॉ.नरेश गुजराती,डॉ.ज्योती गुजराती,श्रीमती स्वाती कुलकर्णी असे विविध स्तरावरील मान्यवर,वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले की,” आपल्याकडे सुदैवाने मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी,साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी,कंधारकर महाराजांची ज्ञानेश्वरी,गूढार्थ दीपिका असे सहज अर्थ प्रगट झालेले ग्रंथ आहेत.ओवी छंदामध्ये ज्ञानेश्वरी जर आपल्याला सोप्या मराठीमध्ये समजेल तर ते अधिक सोयीचे होईल,असे नारायणकाकांना वाटले.त्यामुळे काव्य आणि ज्ञानेश्वरी या दोन्हीचा चांगला समन्वय,मिलाफ “प्रसाद ज्ञानेश्वरी” मध्ये त्यांनी केला असल्याचेही ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी शेवटी सांगितले आहे.

  “प्रसाद जानेश्वरी” हा ६२० पानी ग्रंथ वरद प्रकाशन,इंदिरा नगर,नाशिक येथे सवलतीच्या दरात उपलब्ध असेल ग्रंथ मागणीसाठी ९५५२४७०८७५ संपर्क करावा असे आवाहन वरद प्रकाशनने केले आहे.

   यावेळी लेखक नारायणराव कलकर्णी यांनी त्यांच्या स्वरचित “कृतज्ञनेची दोन फुले” या काव्य ओळीने मनोगत व्यक्त करुन उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close