जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगाव नजीक..या स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव शहराच्या पूर्वेस साधारण पाच की.मी.अंतरावर कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन गायिका सुधा कैलास ठोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण,मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.कोकमठाण येथेही समता स्कूल येथे तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

१५ ऑगष्ट हा स्वातंत्र्य दिन भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण,मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.यावर्षी तर अमृत महोत्सव संपन्न होत आहे.त्यामुळे त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या वर्षी देशभर हा उत्सव संपन्न झाला आहे.कोपरगाव तालुक्यातील समता इंटरनॅशनल स्कूल अपवाद नाही.
सदर प्रसंगी कोपरगाव नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,फॅशन डिझायनर सिमरन खुबाणी,संस्थेच्या विश्वस्त स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलाबचंद अग्रवाल, जितुभाई शहा, गुलशन होडे,भरत अजमेरे,निरव रावलिया,कचरू मोकळ,शोभा दरक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समताच्या शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांनी प्रमुख अतिथी सुधा कैलास ठोळे यांचा सत्कार केला आहे.
सदर प्रसंगी शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर उपप्राचार्य समीर अत्तार यांनी सुत्रसंचलन केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहे.
सदर प्रसंगी सुधा कैलास ठोळे यांनी आपल्या मधुर आवाजात ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत गायले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले.समता स्कूलच्या एल.के.जी.आणि यु.के.जी.तील विद्यार्थी समता स्कूलमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले तर हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचा ऑनलाइन प्रतिसाद लाभला.स्कूलच्या सेकंडरी इनचार्ज शिल्पा वर्मा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close