जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी माणसेच होतात यशस्वी-पो.नि.यांचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)

“स्वतःला विसरून इतरांना ओळखण्यातच आपले आयुष्य खर्ची करतो म्हणून आपण अयशस्वी होतो,त्याऐवजी स्वतःला ओळखून,स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवणारी माणसे कधीच अयशस्वी होत नसल्याचे प्रतिपादन कोपरगावचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“विद्यार्थ्यांनाही देशातील यशस्वी पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी जिद्दीने स्पर्धेला सामोरे जावे तरच ते यशस्वी होतील.विद्यार्थ्यांनी न्यूनगंड विसरावा आणि डॉ.आंबेडकर,डॉ.अब्दुल कलाम या सारख्या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा.”अशोक रोहमारे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेच्या के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपारगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपल्या क्षमतेला एकाच उद्दिष्टावर केंद्रित करा.आयुष्यात दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.वापरात येणाऱ्या क्षमताच विकसित होत असतात अन्यथा त्या नष्ट होतात.आपल्या आजूबाजूला वावरणारे पशुपक्षी देखील आपल्याला खूप काही शिकवतात.पोलीस खात्यात आता शारीरिक क्षमते बरोबरच बौद्धिक क्षमता देखील अधिक महत्वाची आहे.म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून खूप अभ्यास करा.त्याचबरोबर चांगलेव सुसंस्कृत नागरिक बनण्याचादेखील प्रयत्न करा”असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी उपस्थितांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी मार्गदर्शन केले तर या उदघाटन समारंभाचे प्रास्तविक करताना स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके यांनी प्रास्तविक तर प्रा.रवींद्र जाधव यांनी सुरेख सूत्रसंचलन केले.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.सुनिल कुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close