जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…त्या खुनातील आरोपीस पाच दिवसांची कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत तीनचारी येथील चांदगुडे वस्तीवरील रहिवासी असलेला व्यसनी आरोपी आजोबा चंदर उर्फ चंद्रभान देवराम गोधडे (वय वर्ष -५०) यांने अज्ञात कारणावरून त्याचा नातू चि.अथर्व अनिल गायकवाड (वय-०६) यास गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्या प्रकरणी त्यास कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यास कोपरगाव येथील दुसरे दिवाणी न्या.वरिष्ठ स्तर जे.एम.पांचाळ यांनी ०७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर खुनातील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने आरोप कबूल केला आहे.त्याने केलेल्या मारहाणीत या बालकांच्या छातीवर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या या शिवाय एक पाय कंबरेत मोडला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आरोपी चंदर उर्फ चंद्रभान गोधडे हा आपल्या नातवाला घेऊन रहात होता.मयत मुलाचे वडील व आजी या पूर्वीच मयत झालेली असून आईने नवरा मयत झाल्याने काही कालावधीत दुसरे लग्न केलेले आहे. व ती दुसऱ्या नवऱ्याकडे नांदत आहे.त्यामुळे मयत मुलगा व आजोबा चंद्रभान गोधडे हे घरात दोघेच राहत होते.या कुटुंबाचे मुळगाव सिन्नर तालुक्यातील पवारवाडी हे असून आजोबा आपल्या नातवाला घेऊन एकटाच रहात होता.व तेथील शेतकरी विलास चांदगुडे यांचे शेतात शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता.
सदर मुलाला आजोबाचा व त्यांचे नातवाचा अज्ञात कारणावरून बेबनाव झाला असता आजोबा चंद्रभान गोधडे याने आपल्या नातू अथर्व गायकवाड यास काठीने व हाताने मारहाण करून त्यास दि.३१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अवघड जागी मारहाण करून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला होता.व त्याचा पुरावा नष्ठ करण्यासाठी त्याचे प्रेत नवीन आदिवासी स्मशान भूमीत परस्पर घेऊन जाऊन त्याचे दफन केले होते.

दरम्यान या घटनेची कोपरगाव पोलिसांना या घटनेची कुणकुण कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांना लागल्याने गावातील पोलीस पाटील प्रकाश रंगनाथ शिंदे यांनीं त्यानुसार त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा र.क्रं.११७/२०२२ भा.द.वि.कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.व पोलिसानी आरोपीस ताब्यात घेऊन त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने आरोप कबूल केला आहे.त्याने केलेल्या मारहाणीत या बालकांच्या छातीवर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या या शिवाय एक पाय कंबरेत मोडला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आरोपी आजोबा चंद्रभान गोधडे यास आज कोपरगाव येथील दुसरे दिवाणी न्या.वरिष्ठ स्तर जे.एम.पांचाळ यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.सरकारी पक्षाचे वतीने विधीज्ञ एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले होते.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसना निरीक्षक सुरेश आव्हाड हे करित आहे.सदर मुलाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा शव विच्छेदन अहवाल येणे बाकी आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close