जाहिरात-9423439946
अर्थ विषयक

कोपरगावातील…या पतसंस्थेत २४३ कोटींच्या ठेवी-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यात सहकारी पतसंस्थेत अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी संस्थेच्या नुकत्याच संपलेल्या वित्तीय वर्षात २४३ कोटींच्या विक्रमी ठेवी जमा झाल्या असून कर्जदारांना एकूण १५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून यावर्षी संस्थेस एकूण २.५८ कोटींचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“ज्योती सहकारी पतसंस्थेने कोपरगावसह जिल्ह्यात काम करताना कालानुरूप आपल्यात बदल घडविलेले असून सर्व शाखांच्या वतीने आर्थिक व्यवहार चोख ठेवले आहे.चमकोगिरीस आमच्याकडे स्थान नाही,असे सांगून त्यांनी पुढील वर्षाचा विविध योजनांचा आराखडा केलेला असतो.संस्थेच्या या यशात संचालक,सभासद,ठेवीदार,खातेदार आदींचे मोठे योगदान आहे”-रवींद्र बोरावके,अध्यक्ष,ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.

ज्योती सहकारी पतसंस्था हि १९८८ साली स्थापन करण्यात आली आहे.संस्थेला दर वर्षी लेखा लेखा परिक्षणाचा दर्जा ‘अ’ मिळालेला आहे.ज्योती सहकारी नुकत्याच संपलेल्या वित्तीय वर्षात २४३ कोटींचा ठेवी असून कर्जदारांना एकूण १५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे कर्ज वाटपाचा सी.डी.रेशो ६३ टक्के असल्याचे सांगून त्यांनी यावर्षी संस्थेस नुकत्याच संपलेल्या वित्तीय वर्षात एकूण २.५८ कोटींचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
ज्योती नागरी पतसंस्थेने कोपरगावसह जिल्ह्यात काम करताना कालानुरूप आपल्यात बदल घडविलेले असून सर्व शाखांच्या वतीने आर्थिक व्यवहार चोख ठेवले आहे.चमकोगिरीस आमच्याकडे स्थान नाही,असे सांगून त्यांनी पुढील वर्षाचा विविध योजनांचा आराखडा केलेला असतो असे सांगितले आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील,मच्छीन्द्र पठाडे,वाल्मिक भास्कर,चंदरशेखर भोंगळे,कारभारी जुंधारे,महेंद्र नवले,यशवंत आबनावे,राजेंद्र बोरावके,श्याम बोरावके,आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी संस्थेच्या यशात संचालक,सभासद,ठेवीदार,खातेदार,आदींचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close