निवड
कोपरगावातील ज्येष्ठ साहित्यिका…यांना महिला पुरस्कार प्रदान !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
धुळे येथून नियमित प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक अभिनव खानदेशचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी भारती सावंत,खारघर,नवी मुंबई यांच्या लिखाणासाठी आपल्या पत्नी आणि उपसंपादिका कै.नलिनी प्रभाकर सूर्यवंशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देत असलेला “अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर केला होता तो नुकताच प्रदान केला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“गृहिणीपद सांभाळून साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्याची,’अभिनव खानदेश’ची ही परंपरा मागील दोन वर्षापासून सुरू आहे.कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव न मागवता पुरस्कार देण्यात गुणवंताचा खरा सन्मान होतो आहे”-प्रभाकर सूर्यवंशी,खान्देश परंपरा.
सदर पुरस्कार शिर्डी येथील थोर प्रवचनकार साहित्यिक भाऊ थोरात यांच्या हस्ते नुकताच कोपरगाव येथील साई सिटीतील,’रचना पार्क’ येथे प्रदान करण्याचा सोहळा संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील गझलकार राम गायकवाडसर,शिर्डी येथील साहित्यिक आणि व्याख्याते भाऊ थोरात, श्री.भवर,भारती सावंत,सुरेखा बिबवे,निखिल सावंत,प्रियांका सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराची प्रस्तावना करताना संपादक प्रभाकर सूर्यवंशी म्हणाले की,”गृहिणीपद सांभाळून साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्याची,’अभिनव खानदेश’ची ही परंपरा मागील दोन वर्षापासून सुरू आहे.कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव न मागवता पुरस्कार देण्यात गुणवंताचा खरा सन्मान होतो.या पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन गझलकार राम गायकवाड यांनी केले आहे.
सदर प्रसंगी भारती सावंत यांचा सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल आणि बुके देऊन साहित्यिका भारती सावंत यांचा सत्कार केला गेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक भाऊ थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन निखिल सावंत यांनीं केले तर उपस्थितांचे आभार निखिल सावंत यांनी मानले आहे.