जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील…यांची ‘लायन्सच्या झोनल चेअरमन’ पदी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सुधीर डागा यांची लायन्सच्या गत कार्याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची झोनल चेअरमन पदी निवड केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शहरातील विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची जगातील सर्वांत मोठी संघटना.तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’ असे असले तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’ ह्या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे.कोपरगावातही हि संघटना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.कोपरगावात अध्यक्ष म्हणून या पूर्वी सुधीर डागा यांनी यशस्वी पणे आपली कारकीर्द पूर्ण केली आहे.

सुधीर डागा हे कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष असून त्यांनी कोपरगाव येथे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले आहे.या खेरीज त्यांनी लायन्स क्लबच्या सहाय्याने शहरात आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे,अत्यल्प दरात डायलिसिस सेंटर,पात्र प्रश्नाला,लायन्स पार्क,अमर धाम येथे सोलर वाटर हिटर,अर्थोपॅडीक सेंटर,विविध क्रीडा स्पर्धा,उद्योग वाढीसाठी प्रयत्न युवकांना प्रशिक्षण असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहे.त्यांच्या या कार्याची दखल लायन्सचे जिल्हा अध्यक्ष राजेश कोठावदे यांनी घेऊन हि निवड केली आहे.

त्यांच्या या निवडी बद्दल पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,लायन्सचे अध्यक्ष राम थोरे,सत्येन मुंदडा,आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close