जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जमीन वाटपाच्या कारणावरून सख्या भावात हाणामारी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या विठ्ठल लक्ष्मण ठाणगे यास,” तू,शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी यांचे समोर होणाऱ्या सुनावणीस हजर राहू नको” असे म्हणून आरोपी सख्खा भाऊ मच्छीन्द्र ठाणगे याने आपल्याला व आपल्या पुतण्या विलास बाबासाहेब ठाणगे आदींना चापटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा अदखल पात्र गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

दरम्यान दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी महिला गीतांजली ठाणगे हिचे आरोपी हे आपले चुलत सासरे असून त्यांच्यात व आपल्यात विहिरीच्या पाण्यावरून वाद असल्याचे म्हटले आहे.आपण शेतात बारे खोलण्यासाठी गेलो असता आपल्याला आरोपी चुलत सासरे विठ्ठल ठाणगे यांनी,”बारे खोलु नको” असे म्हणून फिर्यादी महिलेच्या गालावरच चापटीने मारले आहे.तर दुसर आरोपी विलास बाबासाहेब ठाणगे यांनी मिळून आपल्याला व आपले सासरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी विठ्ठल ठाणगे व त्याचा सख्खा भाऊ मच्छीन्द्र ठाणगे हे सख्खे भाऊ असून त्यांचा आपापसात जमीन वाटपाचा वाद आहे.त्यांच्यात अनेक वेळा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करूनही त्याला यश मिळाले नाही.त्यामुळे हा वाद वर्तमानात शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे समोर सुरु आहे.त्या प्रकरणी सुनावणी नेमकी आज दि.२३ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार होती.मात्र त्या आधीच सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे हिरामण दशरथ कदम यांचे दुकानासमोर आरोपी मच्छीन्द्र ठाणगे हा आला व त्याने फिर्यादिस
“तू,”शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी यांचे समोर होणाऱ्या सुनावणीस हजर राहू नको” असे म्हणून आरोपी सख्खा भाऊ मच्छीन्द्र विठ्ठल ठाणगे व गीतांजली चेतन ठाणगे यांनी आपल्याला व आपल्या पुतण्या विलास बाबासाहेब ठाणगे आदींना चापटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा अदखल पात्र गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१०३/२०२२ भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या फिर्यादी विठ्ठल ठाणगे यांचे विरुद्ध त्यांची चुलत सून गीतांजली चेतन ठाणगे हिने (गु.र.क्रं.१०२/२०२२ कलमे वरील सारखेच आहे.त्यात फिर्यादी महिलेने) दाखल केला आहे.त्यात त्यांनी आरोपी हे आपले चुलत सासरे असून त्यांच्यात व आपल्यात विहिरीच्या पाण्यावरून वाद असल्याचे म्हटले आहे.आपण शेतात बारे खोलण्यासाठी गेलो असता आपल्याला आरोपी चुलत सासरे विठ्ठल ठाणगे यांनी,”बारे खोलु नको” असे म्हणून फिर्यादी महिलेच्या गालावरच चापटीने मारले आहे.तर दुसर आरोपी विलास बाबासाहेब ठाणगे यांनी मिळून आपल्याला व आपले सासरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले असून प्रतिबंधक कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close