निवड
लहुजी युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी…यांची निवड

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
क्रांतिकारी लहुजी युवासेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची माळ कोपरगाव येथील तरुण कार्यकर्ते परशुराम वसंत साळवे यांची निवड जाहीर झाली असल्याची माहिती भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

परशुराम साळवे यांनी कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली असून त्यांच्या या कार्याची दखल क्रांतिकारी लहुजी सेनेच्या नेतृत्वाने घेतली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान परशुराम साळवे यांच्या या निवडीचे कोपरगाव शहर आणि तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.