जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखान्याच्या निवडणुकीचे फुंकले रणशिंग,…या शेतकरी नेत्याची उद्या बैठक

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबत राजकीय व्यूहरचना सुरु झाली असून शेतकऱ्यांच्या गळितास गेलेल्या उसाच्या ०२ हजार ५०० रुपयांच्या पहिल्या देयकाच्या मागणीसाठी उद्या दि.१५ एप्रिल रोजी सकाळी वाकडी येथील श्री खंडोबा मंदिर सभागृहात शेतकऱ्यांची शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित केली असून राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके,तालुकाध्यक्ष योगेश मोरे आदींनी केले आहे.

दरम्यान याआधी अड्.अजित काळे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या कालव्यांच्या लढ्यात उच्च व सर्वोच्च न्यायालयात मोठे योगदान दिले आहे.तर ‘खंडकरी शेतकरी’,’आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळविण्याचा लढा’ आदी लढे विशेष गाजत आहेत.गतवर्षी त्यांनी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूंकीत प्रस्थापितांविरुद्ध मोठा लढा दिला आहे.त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे.त्यांना राहाता तालुक्यातील शेतकरी मोठा प्रतिसाद देतील असा कयास व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्यातील सहकारी संस्थांच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राज्यातील २० हजार ६४२ सहकारी संस्थांच्या निडणुकांचा धडाका सुरु होत आहे.त्यासाठी ०१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील पात्र कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२३ पासून ते ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त यांनी दिले आहेत.त्यामुळे राज्यातील सर्वच सहकारी संस्थांचे नेते आणि कार्यकर्ते कामास लागले आहेत.त्याला गणेश सहकारी साखर कारखाना आणि या कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि सभासद अपवाद नाही.गत सन-२००६ व २०१६ च्या निवडणुकीत डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या पॅनेलने विखे विरोधात पॅनल देऊन त्यांना मोठी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता.यावर्षी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी मोठा प्रतिसाद दिल्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यांनी या वेळी गणेश सहकारी साखर कारखान्यात आपले भविष्य आजमविण्याचे ठरवलेले दिसत आहे.त्यासाठी सभासदांनी त्यांना आग्रह केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यानुसार त्यांनी राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान येथील सभागृहात शेतकऱ्याची बैठक शनिवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी ०९.३० वाजता आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके,अनिल औताडे यांसह तालुकाध्यक्ष योगेश प्रभाकर,पानसरे मोरे,गणेश मोमले आदींनी उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान याआधी अड्.अजित काळे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या कालव्यांच्या लढ्यात उच्च व सर्वोच्च न्यायालयात मोठे योगदान दिले आहे.तर ‘खंडकरी शेतकरी’,’आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळविण्याचा लढा’ आदी लढे विशेष गाजत आहेत.गतवर्षी त्यांनी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूंकीत प्रस्थापितांविरुद्ध मोठा लढा दिला आहे.त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे.त्यांना राहाता तालुक्यातील शेतकरी मोठा प्रतिसाद देतील असा कयास व्यक्त होत आहे.
त्यासाठी वाकडी येथील शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली असल्याची माहिती विठ्ठल शेळके,अनिल औताडे, योगेश मोरे, प्रभाकर पानसरे,गणेश मोमले आदींनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close