जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरट्यांचा प्रताप सुरु,कोपरगावात ७१ हजारांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही दुचाकी-चार चाकी वाहन चोऱ्या आणि घरफोड्या यांचे पेव फुटले असून नुकतीच समतानगर येथे अजून एक चोरी उघड झाली असून याबाबत तेथील महिला सोनाली गोपीनाथ गायकवाड (वय-३५) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आपल्या घर फोडीतुन सोने व रोख रक्कम असा ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील पहिल्या अनेक चोऱ्यांचा तपास लागलेला नसताना आता समतानगर या उपनगरात त्यांनी आपली हात की सफाई दाखवली आहे.फिर्यादी सुनीता गायकवाड यांच्या घरात रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन आपल्या घराचे कोणातरी अज्ञात चोरट्याने राहते घराचे कुलूप तोडून कपाटाची उचकापाचक करून त्यातील ४५ हजार रुपये किमतीचे ०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस,०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख २६ हजार रुपये त्यात ५०० व २०० रुपये किमतीच्या नोटा असा ७१ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.तर दुसऱ्या दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली आहे.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तो पुन्हा एकदा दहिगाव बोलका येथे आपला प्रताप दाखवला आहे.आता समतानगर या उपनगरात मध्यन्तरी काही दिवस उलटले असल्याने नागरिक बिनधास्त झाले असल्याची संधी साधत त्यांनी आपली हात की सफाई दाखवली आहे.

यातील फिर्यादी सुनीता गायकवाड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”दि.११ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन आपल्या घराचे कोणातरी अज्ञात चोरट्याने राहते घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाची उचकापाचक करून त्यातील ४५ ह हजार रुपया किमतीचे ०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस,०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख २६ हजार रुपये त्यात ५०० व २०० रुपये किमतीच्या नोटा असा ७१ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे.

दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी पुंजाजी तमनर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी गुन्हा क्रं.१७९ /२०२३ भा.द.वि कलम ४५४,४५७,३८० अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close