जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

महावितरण कंपनीचे खाजगीकरण,कोपरगावात विद्युत कर्मचारी संघटनांचा विरोध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘अदानी पावर इलेक्ट्रिकल कंपनी’ने राज्य सरकारच्या मालकीची महावितरण कंपनी वीजपुरवठा करत असलेल्या भांडुप परिमंडळातील ठाणे,नवी मुंबई,उरण व पनवेल या परिसरामध्ये वीजपुरवठा करण्याचा समांतर परवाना राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितला असून त्याला कोपरगाव येथील महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी संघाने विरोध केला असून त्याचे पडसाद काल केलेल्या,”द्वार आंदोलनात” दिसून आले आहे.

महावितरण कंपनी सर्वात जनताभिमुख कंपनी असून ग्राहक आणि शेतकऱ्यास मदत करणारी आहे.नफ्यातून सार्वजनिक उपक्रम राबविणारी असून नवी मुंबई आणि मुंबईत ०१ हजार कोटींचा सर्वाधिक महसूल निर्माण होत असताना तो विभाग खाजगी कंपन्यांच्या घशात घालू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.अदाणी कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे केलेला अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये अदानी पावर इलेक्ट्रिकल कंपनीने राज्य सरकारच्या मालकीची महावितरण कंपनी वीजपुरवठा करत असलेल्या भांडुप परिमंडळातील ठाणे,नवी मुंबई,उरण व पनवेल या परिसरामध्ये वीजपुरवठा करण्याचा समांतर परवाना नुकताच मागितला आहे.अदानीला वरील परिसरामध्ये वीजपुरवठा करण्याचा समांतर परवानगी देऊ नये यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे अर्ज दाखल करण्याचा इशारा दिला आहे.व हरकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.खाजगी भांडवलदारांचा मुंबईमध्ये वीजपुरवठा करत असताना आलेला अनुभव चांगला नाही.सन २००५ मध्ये प्रचंड पाऊस,२६ जुलै २००५ रोजी मुंबई व लगतच्या परिसरा मध्ये झाल्यानंतर संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला होता.महावितरण कंपनीचा वीज पुरवठा मुंबई उपनगरामध्ये होता त्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी,अभियंते व अधिकारी यांनी २४ तासाच्या आत खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करून आपल्या कार्यक्षमतेचे दर्शन संपूर्ण वीज ग्राहकाला घडविले होते.मात्र मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या टाटा व बेस्ट यांना ते शक्य झाले नाही व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाऊन वीजपुरवठा पूर्वक करावा लागला.ओरिसा राज्यातील खाजगी कंपन्यांचा अनुभव चांगला नसल्याने विविध संघटनांनी त्याला विरोध दर्शवला आहे.त्याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात नुकतेच उमटले आहेत.येथील विविध संघटनांनीं त्यास विरोध केला असून द्वार सभा घेऊन त्याचा निषेध केला आहे.

महावितरण कंपनी सर्वात जनताभिमुख कंपनी असून ग्राहक आणि शेतकऱ्यास मदत करणारी आहे.नवी मुंबई आणि मुंबईत ०१ हजार कोटींचा सर्वाधिक महसूल निर्माण होत असताना तो विभाग खाजगी कंपन्यांच्या घशात घालू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.अदाणी कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे केलेला अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

सरकार नागरी विभागातील नफा देणारे जलविद्युत विभाग खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे उद्योग करत आहेत.व सरकारी कोळसा खाणी खाजगी उद्योजकांच्या घशात घालून महावितरण कंपनीला कोलदांडा घालण्याचे पातक करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

सदर प्रसंगी संघर्ष समितीचे जालिंदर पांढरे,नितीन पवार,अनिरुद्ध पगारे,मयूर अष्टेकर,भूषण आचार्य,श्री खराटे,श्री घुमरे,अमर आव्हाड,आदींसह बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close